पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान उद्या एनएचआरसीच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला उपस्थित राहणार

प्रविष्टि तिथि: 11 OCT 2018 6:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिन समारंभाला उपस्थित राहणार आहेत.

यावेळी पंतप्रधान टपाल तिकिट आणि विशेष पाकिट जारी करतील. तसेच एनएचआरसीच्या संकेतस्थळाची नवीन आवृत्तीचा शुभारंभ ते करतील. हे संकेतस्थळ विशेष गरजा असलेल्या व्यक्तींना वापरायला सुलभ असेल.

पंतप्रधान यावेळी उपस्थितांना संबोधित करतील.

 

B.Gokhale/S.Kane/P.Kor


(रिलीज़ आईडी: 1549533) आगंतुक पटल : 86
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English