गृह मंत्रालय
पद्म पुरस्कार 2019 साठी 49,992 विक्रमी नामांकने प्राप्त
प्रविष्टि तिथि:
11 OCT 2018 6:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2018
पद्म पुरस्कार 2019 साठी 49,992 इतके विक्रमी नामांकने प्राप्त झाली असून 2010 च्या तुलनेत ती 32 पटीने अधिक आहेत. 2010 मध्ये 1313, 2016 मध्ये 18,768 तर 2017 मध्ये 35,595 इतके नामांकने प्राप्त झाली होती.
सरकारने खऱ्या अर्थाने पद्म पुरस्काराचे जनतेच्या पुरस्कारांमध्ये परिवर्तन केले आहे. या सर्वोच्च नागरी पुरस्कारांसाठी पात्र उमेदवारांना नामांकन करण्यासाठी जनतेला प्रोत्साहित करण्यात येत आहे.
2016 मध्ये पद्म पुरस्कारांची नामांकन प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली. यामुळे लोकांना सहजपणे यात सहभागी होता येत आहे. नामांकन पत्र पाठवण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2018 होती. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली जाते.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1549450)
आगंतुक पटल : 78
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English