नौवहन मंत्रालय

एप्रिल ते सप्टेंबर 2018 या काळात प्रमुख बंदरांनी नोंदवली 5.12 टक्के वाढ

Posted On: 11 OCT 2018 5:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2018

 

एप्रिल ते सप्टेंबर 2018 या कालावधीत देशातल्या प्रमुख बंदरांनी 5.12 टक्के वाढ नोंदवली. तसेच एकत्रितपणे 343.26 द.ल.टन मालवाहतुकीची हाताळणी केली. गेल्यावर्षी याच कालावधीत ती 326.54 द.ल.टन एवढी होती.

एप्रिल ते सप्टेंबर 2018 या काळात कोलकाता (हल्दीया), परादीप, विशाखापट्टणम, कामराजर, चेन्नई, कोचिन, नवीन मंगलोर, जेएनपीटी आणि दीनदयाल या नऊ बंदरांनी सकारात्मक वाढ दर्शवली.

कामराजर बंदराने (19.66 टक्के), कोचिन (11.51 टक्के), परादीप (11.12 टक्के), हल्दीया (10.07 टक्के) आणि दीनदयाल (10.03 टक्के) सर्वाधिक वाढ नोंदवली.

एप्रिल ते सप्टेंबर 2018 या काळात दीनदयाल बंदराने 58.63 द.ल.टन इतकी सर्वाधिक मालवाहतूक हाताळली. त्याखालोखाल परादीप 52.90 द.ल.टन, जेएनपीटी 34.81 द.ल.टन, विशाखापट्टणम 31.76 द.ल.टन आणि कोलकाता 29.97 द.ल.टन इतकी मालवाहतूक केली.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1549427) Visitor Counter : 77


Read this release in: English