उपराष्ट्रपती कार्यालय

युवकांचे नैराश्य ग्रासण्यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था हे सर्वोत्तम औषध-उपराष्ट्रपती

Posted On: 11 OCT 2018 5:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 11 ऑक्टोबर 2018

 

युवकांचे नैराश्य ग्रासण्यापासून संरक्षण करण्यासाठी कुटुंब व्यवस्था हे सर्वोत्तम औषध असल्याचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज चेन्नई येथे इथिराज महिला महाविद्यालयाच्या 70व्या वर्धापन दिन समारंभात बोलत होते.  

पितृसत्ताक, मूलतत्ववाद, कट्टरतावाद यावर महिलांच्या शिक्षणाशिवाय दुसरा सर्वोत्तम उतारा नाही, असे उपराष्ट्रपती म्हणाले. समाजाच्या सक्षमीकरणासाठी मुलींना शिक्षण देण्याच्या गरजेवर त्यांनी भर दिला. लिंग असमानतेबाबत नाराजी व्यक्त करत त्यांनी कठोर कारवाईचे आवाहन केले.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1549426) Visitor Counter : 83


Read this release in: English