मंत्रिमंडळ

पर्यावरण सहकार्यासाठी भारत आणि फिनलँड यांच्यातील कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 OCT 2018 3:36PM by PIB Mumbai

 

 

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि फिनलँड यांच्यात पर्यावरणीय सहकार्यावरील सामंजस्य सहकार्याला मंजूर दिली आहे. या सहकार्यामुळे दोन्ही देशांमध्ये समानता, परस्परसंबंध आणि परस्पर फायदे यांच्या आधारे पर्यावरण संरक्षण आणि नैसर्गिक संसाधनांचे व्यवस्थापन या क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्याची स्थापना आणि प्रोत्साहन करण्याला बळ मिळणार आहे. यासंदर्भात दोन्ही देशातील लागू कायदे आणि कायदेशीर तरतुदी यांचा विचार केला जाईल.

या सहकार्यामुळे पर्यावरण संरक्षण, चांगले संवर्धन आणि हवामानातील बदल आणि वन्यजीव संरक्षण/संवर्धन यांचे चांगले व्यवस्थापन करण्यासाठी योग्य तंत्रज्ञान आणि सर्वोत्तम पद्धती आणण्यास सहकार्य मिळेल अशी अपेक्षा आहे.

या सामंजस्य सहकार्यांअंतर्गत खालील क्षेत्रामधील सहकार्याचा समावेश असेल:

  • वायू आणि जल प्रदूषण प्रतिबंध आणि शुध्दीकरण, दूषित मातीवर प्रक्रिया ;
  • घातक टाकाऊ पदार्थ आणि कचरा-उर्जा तंत्रज्ञानासह कचरा व्यवस्थापन;
  • वृत्तीय अर्थव्यवस्था प्रोत्साहन, कमी कार्बनासंदर्भातील उपाय आणि जंगलांसह नैसर्गिक स्रोतांचे टिकाऊ व्यवस्थापन.
  • हवामान बदल;
  • पर्यावरण आणि वन देखरेख आणि डेटा व्यवस्थापन;
  • समुद्री आणि तटीय संसाधनांचे संरक्षण;
  • महासागरीय / सागरी बेटांचे एकत्रित जल व्यवस्थापन; आणि
  • इतर कोणत्याही भागात संयुक्तपणे घेतलेले निर्णय.

 

N.Sapre/S.Tupe/P.Kor



(Release ID: 1549208) Visitor Counter : 116


Read this release in: English