मंत्रिमंडळ

कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लेबनॉन यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 10 OCT 2018 2:09PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2018

 

कृषी आणि संबंधित क्षेत्रातील सहकार्यासाठी भारत आणि लेबनॉन यांच्यातील सामंजस्य करारावर स्वाक्षरी करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.

कृषी क्षेत्रात द्विपक्षीय सहकर्य दोन्ही देशांना परस्पर फायदेशीर ठरेल. या करारामुळे दोनही देशांतील सर्वोत्तम शेतीविषयक पद्धती समजून घेण्यास मदत होईल आणि उत्पादकता वाढण्यास तसेच जागतिक बाजारपेठांमध्ये सुधारणा होण्यास सहकार्य मिळेल.

या करारामुळे जगभरातील सर्वोत्तम पद्धती आणि बाजारपेठा उपलब्ध होऊन कृषी उत्पादन आणि उत्पादकता वाढविण्यात मदत होईल. यामुळे उत्पादन आणि उत्पादनक्षमतेत वाढ होण्याच्या दृष्टीने नवीन तंत्रज्ञानाची निर्मिती होईल, यामुळे अन्न सुरक्षा मजबूत होईल.

 

N.Sapre/S.Tupe/P.Kor


(Release ID: 1549171) Visitor Counter : 101
Read this release in: English