मंत्रिमंडळ

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या तिरुपती आणि बेरहमपूर येथे कायम स्वरुपी संकुलाच्या स्थापनेला आणि परिचालनाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 10 OCT 2018 2:05PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तिरुपती (आंध्र प्रदेश) आणि बेरहमपूर (ओदिशा) येथे भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयआयएसईआर) कायम स्वरुपी संकुलाच्या स्थापनेला आणि परिचालनाला मंजुरी दिली. यासाठी एकूण 3074.12 कोटी रुपये खर्च येणार आहे.

आयआयएसईआरमध्ये प्रत्येकी एक रजिस्ट्रार पदाच्या निर्मितीसाठी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.

 

तपशिल

3074.12 कोटी रुपये एकूण खर्च येणार असून यापैकी 2366.48 कोटी रुपये या संस्थांच्या कायमस्वरुपी संकुलाच्या बांधकामासाठी पुढीलप्रमाणे खर्च केले जातील.

संस्था

भांडवल

पुनरावर्ती

एकूण

आयआयएसईआर तिरुपती

1137.16

354.18

1491.34

आयआयएसईआर बेरहमपूर

1229.32

353.46

1582.78

एकूण

2366.48

707.64

3074.12

 

या दोन्ही संस्था 1,17,000 चौ.मी. जागेवर बांधकाम करणार असून यामध्ये प्रत्येक संस्थेत 1855 विद्यार्थ्यांसाठी संपूर्ण पायाभूत सुविधा असतील.

डिसेंबर 2021 पर्यंत या दोन्ही संस्थांच्या कायम स्वरुपी संकुलाचे बांधकाम पूर्ण केले जाईल.

 

लाभ

            आयआयएसईआर पदवी तसेच पदव्युत्तर स्तरावर, पीएचडी आणि एकात्मिक पीएचडीसाठी दर्जेदार विज्ञान शिक्षण पुरवेल. विज्ञान क्षेत्रात ते संशोधन करतील. सर्वोत्तम विज्ञान शिक्षकांना सामावून घेऊन ज्ञान अर्थव्यवस्थेच्या दिशेने भारताला नेण्यासाठी आणि देशात वैज्ञानिक मनुष्यबळाचा भक्कम पाया तयार करण्यात यामुळे मदत होईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1549168) Visitor Counter : 75


Read this release in: English