आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

सुगम्य वैद्यकीय उत्पादनांवरील दुसऱ्या जागतिक परिषदेचे जे. पी. नड्डा यांच्या हस्ते उद्‌घाटन

प्रविष्टि तिथि: 09 OCT 2018 5:28PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली,  9 ऑक्टोबर 2018

 

सार्वत्रिक आरोग्य व्याप्ती हे शाश्वत विकास उद्दिष्ट 2030 कार्यक्रमाचा प्रमुख घटक असून त्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटले आहे. सुगम्य वैद्यकीय उत्पादनांवरील दुसऱ्या जागतिक परिषदेचे उद्‌घाटन आज त्यांनी केले.

यावेळी नड्डा यांनी स्थिती अहवाल प्रकाशित केला. दक्षिण पूर्व आशियातील देशांमध्ये आरोग्य सहकार्याला चालना देण्यासाठी दक्षिण पूर्व आशिया नियामक नेटवर्क सुरू केले. सरकारने आयुष्मान भारत ही 50 कोटींहून अधिक लोकांना वर्षाला 5 लाख रुपयांची आरोग्य विम्याची हमी देणारी योजना सुरू केली असून जगातील सर्वात मोठी योजना असल्याचे ते म्हणाले. आतापर्यंत 50 हजारांहून अधिक लोकांनी या योजनेअंतर्गत सेवेचा लाभ घेतला आहे. शाश्वत विकास उद्दिष्ट 2030 कार्यक्रम साध्य करण्यासाठी सुगम्य वैद्यकीय उत्पादने आणि सार्वजनिक आरोग्यासाठी कायदेशीर वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor

 


(रिलीज़ आईडी: 1549058) आगंतुक पटल : 134
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English