उपराष्ट्रपती कार्यालय
लोकांचे जीवन बदलण्यासाठी नव संशोधनाचा वापर करा-उपराष्ट्रपती
वारंगल येथील एनआयटीच्या हिरक महोत्सवी समारंभाचे उद्घाटन
Posted On:
08 OCT 2018 4:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 ऑक्टोबर 2018
मानवी आयुष्य उत्तमरित्या जगता यावे यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर व्हायला हवा, असे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे. ते आज तेलंगणमधील वारंगल येथील राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थेच्या (एनआयटी) हिरक महोत्सवी समारंभाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
वारंगल हे स्मार्ट शहर आहे, त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभलेला शहर आहे. आधुनिकतेला प्रोत्साहन देताना आपल्या प्राचीन संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी जपण्याचे आवाहन ते करते, असे उपराष्ट्रपती म्हणाले. एनआयटीने तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक संशोधनासाठी केलेल्या विविध उपक्रमांची त्यांनी प्रशंसा केली. एनआयटीने संशोधनावर लक्ष केंद्रीत करावे, असे आवाहन त्यांनी केले.
2025 पर्यंत भारताला 5 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी कटीबद्ध असल्याचे उपराष्ट्रपती म्हणाले. संशोधन करताना पुढल्या 20 वर्षांचा विचार केला जावा, असे मत त्यांनी व्यक्त केले.
N.Sapre/S.Kane/P.Kor
(Release ID: 1548925)
Visitor Counter : 72