पंतप्रधान कार्यालय

3 ऑक्टोबर 2018 रोजी यूएनई पी येथे ‘चॅम्पियन ऑफ  द अर्थ ' या पुरस्कार समारंभात पंतप्रधानांनी केलेले भाषण

Posted On: 03 OCT 2018 6:25PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 3 ऑक्टोबर 2018

 

संयुक्त राष्ट्रचे  महासचिव,  हिज एक्सलंसीं   एंटोनियो गुटेरस जी, मंत्रिपरिषदेचे  माझे  सहयोगी सुषमा स्वराज जी, डॉक्टर हर्षवर्धन जी, डॉक्टर महेश शर्मा, संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचे  कार्यकारी संचालक एरीक सोलहेम, देश-विदेशातून आलेले अतिथिगण,

देवी  आणि सज्जनों।

या  सन्मानासाठी संयुक्त राष्ट्राचा मी  हृदयापासून आभारी आहे. माझ्यासाठी हि विशेष अभिमानाची गोष्ट आहे की, या कार्यक्रमाचे आयोजन हिंदुस्थानच्या धर्तीवर होत आहे आणि यासाठी  संयुक्त राष्ट्राचे  महासचिव स्वयं इथे आले आहे.  एरीक आणि त्यांची पूर्ण टीम इथे आली आहे.  जसे कि मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितले कि,  हा सन्मान पर्यावरणाच्या सुरक्षेसाठी भारताच्या सव्वाशे करोड जनतेच्या प्रतिबद्धतेचा परिणाम आहे.

‘चॅम्पियन्स  ऑफ  द अर्थ’ पुरस्कार भारताच्या अशा नित्य नवीन, चीर पुरातन  परंपरेचा सन्मान आहे ज्यांनी निसर्गात परमात्मा  बघितला आहे , ज्यांनी सृष्टीचे पाच तत्व  जसे कि,-  पृथ्वी, आकाश, अग्नी, जल, वायु यांच्या अधिष्ठानांना आव्हान केले आहे.

हे भारतातील  जंगलात वसलेल्या त्या आदिवासी बहीण - भावांचा सन्मान आहे ,जे आपल्या जीवनापेक्षा जंगलांवर प्रेम करतात. हा अशा मच्छीमारांचा सन्मान आहे, जे नदी आणि समुद्राकडून तेवढच घेतात जेवढी उपयोगिता आहे. हे असे लोक आहे जे कधीही  शाळा किंवा कॉलेजमध्ये गेलेले नाहीत, परंतु हे  लोक मासोळ्यांच्या प्रजननाच्या कालावधीत मत्स्यमारीचे काम बंद करतात, आपल्या कामावर प्रतिबंध घालतात . हा भारताच्या अशा करोडो शेतकऱ्यांचा सन्मान आहे ज्यांच्यासाठी ऋतू चक्र हेच जीवन चक्र आहे, जे आपल्या मातीला प्राणांपेक्षाही प्रिया मानतात.    

हा भारताच्या त्या महान महिलांचा सन्मान आहे ज्यांच्यासाठी पुनरुपयोगिता आणि पुनर्वापर हे रोजच्या जीवनाचा एक हिस्सा झाला आहे. जे रोपांमध्येही  परमात्म्याचे  रूप बघतात, जे तुळशीचे पानही तोडतात, मोजून तोडतात. ज्या मुंग्यांनाही अन्न  देणे पुण्य समजतात. हा पुरस्कार भारतातील प्रकृती आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या अगणित चेहऱ्यांचा  सन्मान आहे जो लाभ, हानी, सुख समृद्धी यांची चिंता न करता दूर कुठल्यातरी गावात , वस्तीत, कुठल्यातरी पहाडावर, कुठल्यातरी  आदिवासी भागात जाऊन कार्य वर्षांपासून काम करीत आहे. मी या सन्मानासाठी आपल्या सर्वांचे हृदयापासून पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो.  

भारतासाठी हि दुहेरी सन्मानाची  संधी देखील आहे, कारण कोची विमानतळाला  देखील पुरस्कार मिळाला आहे. हे  शाश्वत ऊर्जेच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे. यासाठी  मी त्यांचे सर्व सहकारी, संस्था यांचे अभिनंदन करतो  ज्यांना,  वेगवेगळ्या देशांमध्ये, वेगवेगळ्या श्रेणींमध्ये हा पुरस्कार प्राप्त झाला आहे,

मित्रांनो, मी पर्यावरण आणि निसर्ग या  मुद्यांना घेऊन भारतीय दर्शनाची गोष्ट यासाठी करतो कारण वातावरणातील बदल आणि नैसर्गिक आपत्तीचा संस्कृतीशी थेट संबंध आहे. वातावरणाची चिंता जोपर्यंत संस्कृतीचा भाग होत नाही  तोपर्यंत  निसर्गापासून वाचणे कठीण आहे. पर्यावरणाप्रति संवेदनशिलता  आज विश्व मान्य आहे. पण जसे मी आधी म्हटलं की, हजारो वर्षांपासून आमच्या जीवनशैलीचा हा एक  भाग झाला  आहे.  आणि आता  सुषमाजीनी ही  बाब  नमूद केली  आहे. आम्ही

 अशा समाजाचा हिस्सा आहे  जिथे  सकाळी उठल्याबरोबर   सर्वात पहिले धरती मातेला  वंदन करून तिची क्षमा मागितली जाते, कारण आम्ही तीच्यावर आपले पाय ठेवणारे आहोत. एक प्रकारे आपण  आपला  भार धरती वर टाकणार आहेत. आमच्या इथे सांगितले आहे  की,

समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडिते ।

विष्णु पत्नी नमस्तुभ्यं पाद स्पर्शं क्षमश्वमेव ॥

म्हणजे  हे समुद्र रुपी वस्त्र धारण करणारी पर्वत रुपी शरीर असलेली भगवान विष्णूंची पत्नी, हे भूमिदेवी मी आपल्याला नमस्कार करतो. मला क्षमा करा कारण मी आपल्या पायांना स्पर्श करत आहे. हि संवेदना जी आपल्या जीवनाचा हिस्सा आहे वृक्ष वेलींचे पूजन करणे, हवामान, ऋतूंना  व्रत किंवा उत्सवांच्या रूपात मनविणें , पाळण्याची  गाणी किंवा लोक कथांच्या माध्यमातून निसर्गाच्या संबंधांबद्दल बोलणे हि एक प्रकारची सेवा आहे. आम्ही प्रकृतीला सदैव सजीव मानले आहे सहजीवी मानले आहे केवळ सजीव मानले असे नाही तर आम्ही सहजीवी सुद्धा मानले आहे. निसर्गसह या संबंधांबरोबर पूर्ण ब्राह्माणांची कामनेला  आमच्याकडे सर्वोतोपरी मानले  गेले आहे. यजुर्वेदात यासाठीच  सांगितले आहे -     

ॐ द्यौ: शान्तिरन्तरिक्षँ शान्ति:,

पृथ्वी शान्तिराप: शान्तिरोषधय: शान्ति:।

वनस्पतय: शान्तिर्विश्वे देवा: शान्तिर्ब्रह्म शान्ति:,

सर्वँ शान्ति:, शान्तिरेव शान्ति:, सा मा शान्तिरेधि॥

ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:॥

मित्रांनो ! संस्कृतच्या या श्लोकात देवाला अशी  प्रार्थना केली आहे की, वायुमध्ये शांती असू दे, अंतरिक्षात  शांती असू दे, पृथ्वीवर शांती असू दे, पाण्यामध्ये शांती राहू दे, औषधांमध्ये  शांती राहू दे,  वनस्पती मध्ये शांती राहू दे, विश्वात शांती असू दे , सर्व देवतां मध्ये शांती राहू दे.

संपूर्ण  विश्वाच्या  शांतीसाठी या मंत्राद्वारे  आव्हानाशिवाय  आमचा  कोणताही यज्ञ-संस्कार पूर्ण होत नाही, जो पर्यंत  हे होत नाही, हे तर हे, जेंव्हा  स्वयं ईश्वराला जेंव्हा स्वतःचा परिचय द्यायचा असतो, आपल्या विस्ताराचे  वर्णन  करायचे असते तेंव्हा  देव खुद्द म्हणतो –

श्रोतस्य असमी जाह्नवी,

संसार असमी सागर

म्हणजे  मीच जलाशय आहे, मीच नदी  आणि  समुद्र हि मीच. म्हणूनच  हा सन्मान भारतीय जनतेचा आणि  येथील  लोकांच्या आस्थेचा  सन्मान  आहे.

मित्रांनो, भारताची  अर्थव्यवस्था आज अतिवेगाने पुढे सरकत आहे. प्रत्येक वर्षी करोडो लोक भीषण स्थितीतून बाहेर येत आहेत विकासाच्या या घौड -दौडीला आणखीन वेगवान  करण्यासाठी आम्ही समर्पित आहोत. 

यासाठी  नाही की, आम्हाला  कोणाशी  स्पर्धा  करायची  आहे  किंवा  आम्हाला  संपन्नतेचा   लोभ  आहे, परंतु यासाठी की,  स्वतंत्ररोत्तर या भागाला गरिबीच्या स्थितीत  सहन करण्यासाठी सोडून न  देता, त्यांना  स्वाभिमानाचे जीवन देणे हि आमची जबाबदारी आहे. जगातील अनेक देशांपैकी सर्वात गरीब लोकच निसर्गाच्या अंदाधुंद वापराच्या दुष्परिणामांना झेलत आहेत.

दुष्काळ आणि पूर यासारखी परिस्थिती दरवर्षी वाढत आहे आणि  यामध्ये सर्वात जास्त त्रास त्यालाच होतो ज्यांच्या जवळ मर्यादित संसाधन आहेत , जो  गरीब आहे. म्हणूनच, या मोठ्या लोकसंख्येला ,पर्यावरणावर, निसर्गावर, अतिरिक्त भार न देता, विकासाच्या संधींशी जोडण्यासाठी आधाराची गरज आहे. मदतीचा हात देण्याची गरज आहे. यासाठी पॅरिस मध्येही मी ही बाब मांडली होती आणि मी एक शब्द जगासमोर सादर केला.

 ’क्लायमेट जस्टीस’ अर्थात ‘हवामान विषयक न्याय’ यासाठी  मी बाजू मांडली. हवामान बदलाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी, हवामान विषयक न्याय सुनिश्चित केल्यावाचून आपण या परिस्थितीतून बाहेर पडू शकत नाही. पॅरिस करारात ही बाब जगाने मान्य केली आणि हवामान विषयक न्याय या संकल्पनेला कटीबद्धताही दर्शवली. मात्र ही कल्पना वास्तवात आणण्यासाठी आपल्याला बरेच काम करायचे आहे आणि ते वेगाने करायचे आहे.

इथे उपस्थित महामहिम, एंटनियो गुटेर्स यांचे मी विशेष आभार मानतो की त्यांनी काळाची गरज जाणली, क्योटो कराराच्या दुसऱ्या  प्रतिबद्धता काळाच्या मंजुरीची प्रक्रिया आणि शाश्वत विकास उद्दिष्टाच्या अंमलबजावणीत गती आणण्यासाठी भरघोस प्रयत्न केले. म्हणूनच भारतात आम्ही, 'सबका साथ, सबका विकास', हा मंत्र घेऊन वाटचाल करत आहोत. सबका विकास म्हणजेच सर्वांचा विकास असे मी म्हणतो तेव्हा त्यात निसर्गाचाही समावेश आहे आणि त्यात सबका साथ म्हणजे सव्वाशे कोटी देशवासीयांच्या सक्रिय भागीदारीचे आवाहन करतो.

मित्रहो,आपल्या अर्थव्यवस्थेसाठी,गाव आणि शहरे हे दोन्ही महत्वपूर्ण स्तंभ आहेत. आपल्याकडे रोजगाराचा एक मोठा भाग गाव आणि शेतीशी जोडला गेलेला आहे, तर आपली शहरे सेवा आणि उत्पादन म्हणजेच उद्योग केंद्रे आहेत म्हणूनच सरकार सर्वंकष दृष्टिकोन ठेवून काम करत आहे. देशाचा वर्तमान आणि भविष्य काळासाठी,हरित आणि स्वच्छ पर्यावरण यावर सरकारच्या प्रत्येक धोरणाचा भर आहे.  मित्र हो, आपली गावे, पर्यावरणाप्रती नेहमीच जागरूक राहिली आहेत, निसर्गाशी जवळीक राखून आहेत.

गेल्या चार वर्षांत, गावांनी,आपल्या या शाश्वत शक्तीचा अधिक विस्तार केला. टाकाऊ पदार्थांपासून  संपत्ती आणि टाकाऊतून ऊर्जा, हे जर केले तर  यातून जैव कचरा आणि टाकाऊ पदार्थांचे  ऊर्जेत रूपांतर करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. सेंद्रिय शेती ते मृदा आरोग्य कार्ड आणि 'पर ड्रॉप मोअर क्रॉप' म्हणजेच थेंबा गणिक अधिक पीक यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे.  यामुळे आपली जमीन आणि जल स्रोतांना विषारी रसायनांपासून मुक्त राहण्यासाठी मदत होत असून पाण्याचा योग्य उपयोग करण्याकडे कल वाढला आहे. उद्योग आणि उत्पादनाबाबत बोलायचे झाले तर झिरो डिफेक्ट, झिरो इफेक्ट हा आमचा उद्देश आहे. आम्ही कृषीबाबत बोलतो तेव्हा आमचे उद्दिष्ट असते पर ड्रॉप  मोअर  क्रॉप.

मित्रहो, सर्वात वेगाने शहरीकरण होणाऱ्या, जगातल्या देशांपैकी भारत एक आहे. आपले शहरी जीवन अद्ययावत आणि सातत्यपूर्ण करण्यावर आम्ही भर देत आहोत. आज देशभरात अद्ययावत पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे आणि शाश्वत पर्यावरण आणि समावेशक विकासाचे उद्दिष्ट ठेवून त्यांची निर्मिती केली जात आहे. आज देशात 100 स्मार्ट सिटीचे काम वेगाने सुरू आहे. अगदी गटारापासून ते सतर्कतेपर्यंत स्मार्ट व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. स्थानिक लोकांच्या सुचनांच्या आधारे अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवीकरणीय ऊर्जा या व्यवस्थेचा आधार आहेत. देशाचे राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती मार्ग पर्यावरण स्नेही पद्धतीने तयार केले जात आहेत. त्याच बरोबर हरित कॉरिडॉर विकसित करण्यात येत आहे.

नव्या महामार्गा बरोबर विकसित करण्यात येत असलेल्या सर्व ऊर्जा गरजा, सौर उर्जेद्वारा  भागवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत. शहरांचे परिवहन जाळे असलेली मेट्रोही सौर उर्जेशी जोडली जात आहे, त्याच बरोबर रेल्वेची जीवाश्म इंधनावरची निर्भरता आम्ही झपाट्याने कमी करत आहोत.

मित्रहो, आज भारतात, घराघरात, गल्लोगल्ली, कार्यालये, रस्ते, बंदरांपासून ते विमानतळापर्यंत सर्व ठिकाणी जल आणि ऊर्जा संवर्धनाचे अभियान जोमाने सुरू आहे. एलइडी बलब पासून ते रेन वॉटर हार्वेस्टिंग पर्यंत तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यात येत आहे. घरातल्या स्वयंपाकघरापासून ते वाहतूक क्षेत्रापर्यंत, सर्व क्षेत्रे स्वच्छ ऊर्जेवर आधारित करण्याच्या दिशेने आम्ही वेगाने काम करत आहोत. गेल्या चार वर्षात दहा कोटींपेक्षा जास्त घरांना एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत ज्यात साडेपाच कोटींपेक्षा जास्त जोडण्या, उज्वला योजनेच्या माध्यमातून देण्यात आलेल्या मोफत गॅस जोडण्या आहेत. घरांबरोबरच दळण वळणही धूर मुक्त करण्याचे अभियान सुरू आहे. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी एनसीएपी म्हणजे राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमावर काम सुरू आहे. वाहनांसाठी उत्सर्जन मानक निश्चित करण्याच्या वेळी आम्ही BS- 4 पासून थेट BS-6 मानक लागू करण्याचा निर्णय घेतला.

मित्रहो, आज, जीवन सुकर करण्यावर भारताचा भर आहे. सर्वाना घर, सर्वाना वीज, सर्वाना अन्न, सर्वाना शिक्षण, सर्वाना रोजगार हे आमचे महत्वाचे पैलू आहेत.  पर्यावरणाप्रती,आमची कटीबद्धता कमी न होता वाढतच राहिली आहे.

 येत्या दोन वर्षात, कार्बन उत्सर्जन, 2005 च्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 2030 पर्यंत हे उत्सर्जन 30 ते 35 टक्क्यांनी कमी करण्याचा आमचा प्रयत्न राहील. या साऱ्या प्रयत्नात आम्हाला सर्वात मोठे यश मिळाले आहे ते म्हणजे लोकांच्यातला वर्तनात्मक आणि मानसिकतेत झालेला बदल. पर्यावरणाप्रती आस्था आपल्या आचरणातूनही अधिकाधिक मजबूत होत आहे.

 याचमुळे भारत आज संकल्प करू शकला की 2022 पर्यंत, एकदाच वापरात येणाऱ्या  प्लॅस्टिक पासून मुक्त होण्याचा. महात्मा गांधी यांच्या महान व्यक्तीत्वातून प्रेरणा घेत, भारत आपले संकल्प पूर्ण करेल आणि जगासाठी एक आदर्श घालून देईल असा मला विश्वास आहे. भारताच्या प्रयत्नांचा सन्मान केल्याबद्दल मी   एकदा संयुक्त राष्ट्रांचे मनःपूर्वक आभार मानतो.

आपण सर्व जण वेळ काढून या महत्वपूर्ण प्रसंगी उपस्थित राहिलात, माझी ही वैयक्तिक जबाबदारी राहते की जे संकल्प घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत, ते पूर्ण करण्यात आम्ही कोणतीही कसर ठेवणार नाही, आपण पुढे येऊन आमचा  संकल्प अधिक दृढ केला आहे.

यासाठी मी  आपणा सर्वाना मनःपूर्वक धन्यवाद देतो !.

                                                

B.Gokhale/N.Chitale /P.Kor



(Release ID: 1548916) Visitor Counter : 78


Read this release in: English