रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वे आणि रशियन रेल्वे यांच्यात सहकार्य करार

Posted On: 05 OCT 2018 6:24PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2018

 

रेल्वे मंत्रालय आणि रशियातली जॉईंट स्टॉक कंपनी रशियन रेल्वे यांच्यात आज सहकार्य करार झाला. भारत-रशिया शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हा करार झाला. दोन्ही देशात 24 डिसेंबर 2015 रोजी स्वाक्षऱ्या करण्यात आलेल्या सामंजस्य करारात नमूद केलेल्या बाबीं सुरु ठेवण्याचा या सहकार्य कराराचा उद्देश आहे.

नागपूर-सिंकदराबाद विभागाच्या स्पीड अप ग्रेडेशन प्रकल्पाची अंमलबजावणी, मालवाहतूकीतल्या उत्तम प्रथा, दोन्ही देशात वापरण्यात येणाऱ्या उत्तम तंत्रज्ञानाचे आदान-प्रदान यांचा या सहकार्य करारात समावेश आहे.  

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1548764) Visitor Counter : 121


Read this release in: English