उपराष्ट्रपती कार्यालय

अवयवदानासाठीच्या अभियानाला वेग देण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन

Posted On: 05 OCT 2018 6:21PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 5 ऑक्टोबर 2018

 

मूत्रपिंड, फुफ्फुस, स्वादुपिंड यासारखे अवयव निकामी होण्याच्या वाढत्या प्रमाणामुळे या अवयवांची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी अवयव दान बाबतच्या अभियानाला वेग देण्याचे आवाहन उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केले आहे.

इंडियन सोसायटी ऑफ ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनच्या 29 व्या वार्षिक परिषदेत हैदराबाद इथे ते आज बोलत होते. देशात अवयव दानाची मोठी गरज आहे. मात्र त्या तुलनेत उपलब्धता अत्यंत मर्यादित आहे. या बाबीकडे त्यांनी लक्ष वेधले. गेल्या चार-पाच वर्षात मृत्यूनंतर अवयव दान करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे तरीही मागणी आणि पूर्तता यात मोठे अंतर आहे.

परंपरा, धार्मिक प्रथा यामुळे हे अंतर असून डॉक्टर, स्वयंसेवी संस्था आणि इतरांनी, अवयव दानाच्या महत्वाबाबत जनजागृती करावी असे आवाहन त्यांनी केले.  

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1548762) Visitor Counter : 84


Read this release in: English