मंत्रिमंडळ

भारत आणि रशिया दरम्यान रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 03 OCT 2018 9:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि रशिया दरम्यान रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्यावरील सामंजस्य कराराला मंजुरी दिली आहे.रशियाच्या अध्यक्षांच्या भारत भेटीदरम्यान या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या जाणार आहेत.

वाहतूक आणि महामार्ग क्षेत्रात सहकार्यासाठी औपचारिक मंच स्थापन आणि विकास करण्याच्या दृष्टीने रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग क्षेत्रातील सामंजस्य करार दोन्ही देशांनी मिळून तयार केला आहे आणि अंतिम स्वरूप दिले आहे.

रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योगातील द्विपक्षीय सहकार्यामुळे उभय देशांना लाभ होईल. रशियाबरोबर सहकार्य आणि आदानप्रदानातील वाढीमुळे  रस्ते वाहतूक आणि रस्ते उद्योग तसेच कुशल वाहतूक प्रणाली (आईपीए) मध्ये दळणवळण आणि सहकार्यसंबंधी प्रभावी आणि दीर्घकालीनं द्विपक्षीय संबंध स्थापित करण्यात मदत मिळेल.

यामुळे रस्ते पायाभूत विकासाच्या प्रशासन आणि आयोजनात तसेच देशात रस्ते तंत्र व्यवस्थापन, वाहतूक धोरण, तंत्रज्ञान आणि महामार्गांचे संचलन आणि बांधकामासाठी मानक स्थापन करण्यात मदत होईल. याशिवाय भारत आणि रशियामधील द्विपक्षीय संबंध मजबूत होतील.

पार्श्वभूमी:-

भारत आणि रशियादरम्यान जुने संबंध असून धोरणात्मक भागीदारी स्तरावर उभय देशांमध्ये मजबूत आर्थिक सम्बन्ध आहेत. रशियाने उपग्रह आधारित पथकर प्रणालीसाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रात तंत्रज्ञान संबंधी रशियाचा अनुभव लक्षात घेऊन सहकार्याच्या माध्यमातून उत्कृष्ट पद्धती शिकता येईल. भारत महामार्ग संरचना संवर्धन योजना वेगाने लागू करत आहे. उभय देशांदरम्यान भागीदारीतून संचालन स्तरावर आदान-प्रदानाचा मंच उपलब्ध होईल. यामुळे दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध मजबूत होतील.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1548527) Visitor Counter : 166


Read this release in: English