मंत्रिमंडळ

राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्था भोपाळ ऐवजी सिहोर इथे उभारायला मंत्रिमंडळाची मान्यता

Posted On: 03 OCT 2018 8:54PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत, याआधी  16 मे 2018 रोजी घेण्यात आलेल्या निर्णयात अंशतः सुधारणा करत, राष्ट्रीय मानसिक पुनर्वसन संस्था मध्य प्रदेशातल्या भोपाळ ऐवजी सिहोर जिल्ह्यात ( भोपाळ –सिहोर महामार्ग )इथे उभारण्याला मान्यता देण्यात आली.

मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात देशात अशा प्रकारे उभारण्यात येणारी ही पहिली संस्था असेल. मानसिक आरोग्य पुनर्वसन क्षेत्रात,मानव संसाधन आणि संशोधन क्षमता उभारण्याला या संस्थेमुळे मदत होणार आहे. मानसिक आजार ग्रस्त रुग्णांच्या पुनर्वसनासाठी उत्तम आदर्श मॉडेल ही संस्था सुचवणार आहे.

 

B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar

 


(Release ID: 1548526)
Read this release in: English