मंत्रिमंडळ

भोपाळमधील मेट्रो रेल्वे जोडणीला चालना

(i)करोंद सर्कल ते एम्स आणि (ii)भडभडा स्क्वेअर ते रत्नागिरी तिराहा या दोन कॉरिडॉर्सचा समावेश असलेल्या भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 03 OCT 2018 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  3 ऑक्टोबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने भोपाळमधील प्रमुख भागांना जोडणाऱ्या  करोंद सर्कल ते एम्स  (14.99 किमी ) आणि (ii)भडभडा स्क्वेअर ते रत्नागिरी तिराहा (12.88 Km)  या एकूण 27.87 किमी लांबीच्या दोन कॉरिडॉर्सचा समावेश असलेल्या भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अंमलबजावणीला मंजुरी दिली. 

विवरण :

करोंद  ते एम्स  कॉरिडॉर्सची लांबी 14.99 किमी  असेल आणि बहुतांश विकसित तर थोडा भाग भुयारी ( भोपाळ रेल्वे स्थानक आणि बस स्थानक)असेल आणि एकूण 16 स्थानके असतील.(14-उन्नत तर  2-भुयारी)

 भडभडा  ते रत्नागिरी तिराहा हा कॉरिडॉर 12.88 किमी लांबीचा असेल आणि यातील सर्व  14 स्थानके विकसित असतील.

यामुळे शहरात किफायतशीर, विश्वासार्ह, सुरक्षित आणि वेगवान वाहतूक व्यवस्था उपलब्ध होईल. तसेच अपघात, प्रदूषण, प्रवासाचा वेळ, इंधनाचा वापर, समाज-विरोधी घटना कमी होतील आणि शाश्वत विकासासाठी जमिनीचा वापर आणि विस्तार यांचे नियमन होईल.

प्रकल्पाचा एकूण खर्च  6941.40 कोटी रुपये असून चार वर्षात हा प्रकल्प पूर्ण केला जाईल.

लाभ:

भोपाळमधील  23 लाख लोकसंख्येला भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पामुळे प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष लाभ होण्याची शक्यता आहे. रेल्वे आणि बस स्थानकांशी हे कॉरिडॉर्स विविध ठिकाणी जोडलेले असतील. या प्रकल्पातून भाडे आणि जाहिराती स्वरूपात तसेच टीओडी आणि टीडीआरच्या माध्यमातून महसूल मिळेल.

 या मेट्रो रेल्वे कॉरिडॉर लगतच्या रहिवासी भागाला या प्रकल्पाचा लाभ होणार असून त्यांना शहरातील विविध भागात पोहचणे सोयीचे होईल.

करोंद ते एम्स कॉरिडॉर शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणार असून बस, रेल्वे स्थानक आणि एम्सच्या दाट लोकवस्तीच्या भागाला जोडेल. भडभडा ते रत्नागिरी कॉरिडॉर आगामी स्मार्ट सिटीच्या क्षेत्र आधारित विकास(एबीडी)ला बीएफआयईएल आणि आसपासच्या औद्योगिक भागाला जोडेल. नागरिक, प्रवासी, औद्योगिक कर्मचारी , पर्यटक यांना ही मेट्रो रेल्वे पर्यावरण-स्नेही आणि शाश्वत सार्वजनिक वाहतूक सेवा पुरवेल.

प्रगती:

या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी मध्य प्रदेश मेट्रो रेल कं .लि. ची स्थापना करण्यात आली आहे.

भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पाला केंद्र सरकार आणि मध्य प्रदेश सरकार समप्रमाणात आणि  युरोपिअन इन्व्हेस्टमेंट बँकेकडून अंशतः कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य पुरविण्यात येईल.

 भोपाळ मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून मे. लुईस बर्गर एसएएस आणि मे. जिओडेटा इंजिनीरिंग यांच्यासह मे . डीबी इंजिनीअरिंग अँड कन्सल्टिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील कामासाठी निविदा मागवण्यात आल्या असून लवकरच काम सुरु होईल.

 

B.Gokhale/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1548443) Visitor Counter : 64


Read this release in: English