कंपनी व्यवहार मंत्रालय
प्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी सरकारकडून प्रतिस्पर्धा आढावा समिती स्थापन
Posted On:
30 SEP 2018 4:41PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2018
मजबूत आर्थिक ढाच्याच्या आवश्यकतेला अनुरूप कायदा सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, प्रतिस्पर्धा कायद्याचा आढावा घेण्यासाठी, सरकारने प्रतिस्पर्धा कायदा आढावा समिती स्थापन केली आहे.
2002 मधे प्रतिस्पर्धा कायदा संमत करण्यात आला आणि त्यानंतर भारतीय स्पर्धा आयोग स्थापन करण्यात आला. गेल्या 9 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेची वेगाने वृद्धी झाली असून आज भारत जगातल्या सर्वात पाच मोठ्या अर्थ व्यवस्थांपैकी एक आहे आणि त्यात अधिक प्रगतीची आशा आहे. या संदर्भात प्रतिस्पर्धा कायदा मजबूत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
कंपनी व्यवहार मंत्रालयाचे सचिव या आढावा समितीचे अध्यक्ष राहतील. भारतीय प्रतिस्पर्धा आयोगाचे अध्यक्ष आणि भारतीय नादारी आणि दिवाळखोरीविषयक मंडळाचे अध्यक्ष याचे सदस्य राहतील. याशिवाय 5 आणखी सदस्य आणि एक सदस्य सचिव या समितीत राहणार आहे.
बदलत्या व्यापार वातावरणाच्या पार्श्वभूमीवर, प्रतिस्पर्धा कायदा, नियम यांचा आढावा घेणे आणि आवश्यकता भासल्यास त्यात बदल करणे, स्पर्धा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय उत्तम प्रथा अभ्यासणे, याबरोबरच स्पर्धात्मकतेशी संबंधित इतर मुद्यांमधे ही समिती लक्ष घालणार आहे.
N. Sapre/N. Chitale/D.Rane
(Release ID: 1548000)
Visitor Counter : 102