राष्ट्रपती कार्यालय

महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे राष्ट्र्पतींच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 29 SEP 2018 7:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2018

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते, आज नवी दिल्ली इथे, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे उद्‌घाटन करण्यात आले.

स्वच्छता आणि हागणदारी मुक्त गावे आणि शहरे याचा व्यापक प्रभाव असून ही सामाजिक आणि आर्थिक गुंतवणूक आहे. शौचालय आणि योग्य स्वच्छता  तसेच आरोग्य विषयक प्रक्रियेअभावी कुपोषण आणि जीवनविषयक मोठे नुकसान होऊ शकते. यामुळे भारतासारख्या देशात, मनुष्य बळ, तसेच आपल्या जनतेच्या आरोग्य सुरक्षेसाठी आणि आपल्या बालकांच्या उज्वल भविष्यासाठी स्वच्छ भारत अभियानाचे विशेष महत्व आहे. मुलींसाठी स्वच्छतागृह नाही म्हणून कोणत्याही मुलीला शाळा सोडावी लागता कामा नये असे ते म्हणाले.

 अपुऱ्या स्वच्छतेच्या समस्येवर मात करण्यासाठी  राष्ट्रपतींनी पाच महत्वपूर्ण  सूत्रे सुचवली. जन केन्द्री आराखडा, स्वच्छता कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि व्यवस्थापन, प्रभावी सेवेसाठी उत्तम आणि किफायतशीर तंत्रज्ञानाचा वापर, स्वच्छता मोहिमेसाठी कल्पक वित्तीय साधनांची निर्मिती, सरकारमध्ये स्वच्छता कार्यक्रम  तयार करणे, लागू करणे आणि देखरेख ठेवण्याची क्षमता विकसित करणे यांचा यात समावेश आहे.

महात्मा गांधींच्या 150 व्या जयंती निमित्त होणाऱ्या कार्यक्रमाची सुरवात म्हणून पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाकडून  आंतरराष्ट्रीय स्वच्छता संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे.

 

N. Sapre/N. Chitale/D.Rane

 



(Release ID: 1547982) Visitor Counter : 86


Read this release in: English