विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज : जैवतंत्रज्ञान विभाग सचिव


भारत आंतरराष्ट्रीय चौथ्या विज्ञान उत्सवाची ओळख करून देणारा कार्यक्रम आज टीआयएफआर येथे संपन्न

Posted On: 29 SEP 2018 7:07PM by PIB Mumbai

मुंबई, 29 सप्टेंबर 2018

 

भारत आंतरराष्ट्रीय चौथ्या विज्ञान उत्सवाचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती, टीआयएफआर म्हणजेच टाटा मूलभूत संशोधन संस्थेतील जैवतंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांनी आज दिली, या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करणारा, ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम आज टीआयएफआर येथे आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला एकून 10,000 प्रतिनिधी येतील, ज्यात, 5000 विद्यार्थी, 550 शिक्षक, ईशान्य भारतातील 200 विद्यार्थी आणि 20 परदेशी प्रतिनिधींचा समावेश असेल. तसेच सुमारे 200 स्टार्ट अप कंपन्या या उत्सवात सहभागी होतील असेही त्यांनी सांगितले.

यावर्षीच्या उत्सवाची संकल्पना ‘परिवर्तानासाठी विज्ञान’ अशी आहे, असे त्या म्हणाल्या. गेल्या चार वर्षात, भारतात विज्ञान क्षेत्रात आमूलाग्र बदल झाले आहेत. मग ते मूलभूत विज्ञान असो की उपयोजित विज्ञान असे त्या म्हणाल्या. तसेच गेल्या काही वर्षात देशातील सर्व विज्ञान संस्था, एकत्र काम करत आहेत. आणि त्यांच्या एकत्रित संशोधनातून समाजातील समस्यांवर तोडगा शोधत आहेत, हा खूप महत्वाचा बदल असल्याचे त्या म्हणाल्या.

देशाच्या एकात्मिक वाढीत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या महत्वाच्या भूमिकेचा उल्लेख करत त्यांनी सावर शास्त्रज्ञाना समन्वय राखून एकत्रित कम करण्याचे आवाहन केले. देशाच्या आणि देशातील जनतेच्या सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या वापराच्या सरकारच्या धोरणाचा स्वरूप यांनी आपल्या भाषणात आवर्जून उल्लेख केला.

या उत्सवानिमित्त आयोजित केल्या जाणार्या विविध कार्यक्रमांची त्यांनी यावेळी माहिती दिली. विज्ञान सर्वसामान्य जनता आणि ग्रामीण भागात पोचवण्यासाठी विज्ञान ग्राम कार्यक्रम, सांसद आदर्श ग्राम योजनेशी जोडला गेला आहे, असे त्यांनी सांगितले. 

महिला शास्त्रज्ञाना आणि स्वयंउद्योजकाना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे सांगत विज्ञानाच्या मदतीने विकासाचा आलेख मांडण्याच्या आवश्यकतेवर त्यांनी भर दिला. या कार्यक्रमात 800 महिला शास्त्रज्ञ सहभागी होणार आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील सर्व व्यक्ती एकत्र येऊन ‘विज्ञान से विकास’ हे उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करतील, असे स्वरूप यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला टीआयएफआर संस्थेतील मान्यवर आणि शास्त्रज्ञ, विद्यार्थी आणि प्राध्यापक उपस्थित होते.

 

 

 

N. Sapre/R. Aghor/D.Rane

 

 



(Release ID: 1547979) Visitor Counter : 100


Read this release in: English