संरक्षण मंत्रालय

नौदलाच्या पश्चिम विभागात 'पराक्रम पर्व' सुरू

Posted On: 29 SEP 2018 7:46PM by PIB Mumbai

मुंबई, 29 सप्टेंबर 2018

 

भारताने केलेल्या लक्ष्य भेदी हल्ल्याला दोन वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल साजऱ्या करण्यात येत असलेल्या पराक्रम पर्वाचा एक भाग म्हणून मुंबईत, नौदल गोदी इथे पश्चिम विभागाच्या ताफ्यातल्या, मुंबई आणि ब्रह्मपुत्र या जहाजांना सुमारे 6000 शालेय विद्यार्थ्यांनी आज भेट दिली. एनसीसी, सी कॅडेट कॉर्प्स तसेच मुंबई आणि परिसरातल्या 30 शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा यात समावेश होता.

मुंबईतल्या नौदल गोदी इमारतीत, ठेवण्यात आलेल्या जहाज, विमाने यांच्या प्रतिकृती, शस्त्रात्रे आणि साधनांच्या प्रदर्शनांदरम्यान विद्यार्थ्यांनी नौदलाच्या कर्मचाऱ्यांशी उत्साहाने संवाद साधला.

भारतीय सैन्याने केलेल्या लक्ष्यभेदी हल्ल्यासह सागरी कमांडो आणि भारतीय नौदलाच्या विविध साहसी कार्याची झलक विद्यार्थ्यांनी व्हिडीओ द्वारे अनुभवली. ग्राफीटी वॉल वर, सशस्त्र दल जवानांच्या बलिदानाचे स्मरण आणि सैन्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात विद्यार्थी हिरीरीने सहभागी झाले. बलार्ड पिअर इथे विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिकांना यावेळी नौदल बँड धून अनुभवता आल्या.

 

N. Sapre/N. Chitale/D.Rane

 



(Release ID: 1547972) Visitor Counter : 80


Read this release in: English