रेल्वे मंत्रालय

रेल्वेच्या रेल हेरिटेज डिजिटायजेशन प्रोजेक्टचे पियुष गोयल यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 28 SEP 2018 7:42PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर 2018

 

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी गुगल आर्ट्‌स, कल्चरच्या सहकार्याने निर्माण केलेल्या रेल्वेच्या रेल हेरिटेज डिजिटायजेशन प्रोजेक्टचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे उद्‌घाटन केले. https://artsandculture.google.com/project/indian-railways या लिंक द्वारे हा प्रकल्प पाहता येणार आहे. देशाचा रेल्वे वारसा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरही ऑनलाईन मंचावर यामुळे पाहता येणार आहे. 165 वर्षाच्या या जुन्या संस्थेकडे जतन करण्यासाठी समृद्ध परंपरा लाभली आहे. भारतातली पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे दरम्यान धावली त्यामुळे रेल्वेच्या इतिहासात मुंबईला विशेष स्थान आहे असे गोयल म्हणाले. देशातल्या वेगवेगळ्या ठिकाणी या ऐतिहासिक प्रकल्पासाठी 22 डिजिटल स्क्रीन उभारण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

 

S.Tupe/N.Chitale/ P.Malandkar

 

 

 


(Release ID: 1547887)
Read this release in: English