माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ॲमेझॉन ॲलेक्झावर आकाशवाणी सेवेचा राज्यर्वधन राठोड यांच्या हस्ते प्रारंभ

Posted On: 28 SEP 2018 6:38PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  28 सप्टेंबर 2018

 

ॲमेझॉन ॲलेक्झा स्मार्ट स्पीकरवर आकाशवाणी सेवेचा माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते आज प्रारंभ करण्यात आला. प्रसारभारतीचे अध्यक्ष ए. सुर्यप्रकाश, प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शशी शेखर वेंपती यांच्यासह ॲमेझॉन ॲलेक्झाचे राजीव स्वाहनी आणि माहिती प्रसारण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ॲमेझॉन ॲलेक्झावर आकाशवाणीची सेवा म्हणजे जुन्या आणि आधुनिक दळणवळणाचा संगम असल्याचे राज्यवर्धन राठोड यावेळी म्हणाले. या सेवेचा जगभरात राहणाऱ्या भारतीयांना लाभ होईल. जगाच्या कोणत्याही भागात आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकता येतील असे ते म्हणाले.

 

 

ॲमेझॉन ॲलेक्झावर आकाशवाणीच्या विविध भारती आणि चौदा इतर प्रादेशिक भाषेतल्या सेवा उपलब्ध करुन दिल्या जातील. भविष्यात आकाशवाणीच्या संग्रहातला दुर्मिळ ठेवाही ॲमेझॉन ॲलेक्झावर उपलब्ध करुन दिला जाणार आहे.   

 

N.Sapre/N.Chitale/ P.Malandkar


(Release ID: 1547857) Visitor Counter : 137
Read this release in: English