पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
पेट्रोलियम मंत्र्यांच्या हस्ते “सतत” उपक्रमाचे उद्घाटन होणार
Posted On:
28 SEP 2018 5:52PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2018
पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान नवी दिल्लीत येत्या 1 ऑक्टोबरला एका कल्पक उपक्रमाचा प्रारंभ करणार आहेत. ऑटोमेटीव्ह इंधन म्हणून कॉम्प्रेस बायोगॅस बाजारात उपलब्ध करुन देण्यासाठी उत्पादन कारखाना उभारण्यासाठी संभाव्य उद्योजकांकडून स्वारस्य मागवण्यात येणार आहे. या महत्वपूर्ण उपक्रमामुळे परवडणाऱ्या दरात वाहतुकीसाठी इंधन उपलब्ध होण्यासाठी चालना मिळणार असून शेतातल्या टाकाऊ पदार्थांचा, शेणाचा उत्तम उपयोग केला जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांना उत्पन्नाचे आणखी साधनही उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम वाहनाचा वापर करणाऱ्यांना आणि उद्योजक आणि शेतकऱ्यांनाही लाभदायक ठरावा या उद्दिष्टाने सुरु करण्यात येणार आहे. सस्टेनेबल अल्टरनेटिव्ह टूवर्डस् ॲफॉरडेबल ट्रान्सर्पोटेशन “सतत” असे या उपक्रमाचे नांव आहे. घनकचरा व्यवस्थापन आणि शेतातली धाटं जाळल्यामुळे निर्माण होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्नही या उपक्रमामुळे निकाली निघणार आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या आयातीवरच अवलंबयित्वही कॉम्प्रेस बायोगॅसमुळे कमी होणार आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याचा पंतप्रधानांचा निर्धार पूर्ण होण्यासाठी त्याचबरोबर ग्रामीण रोजगार आणि उद्योजकता वृद्धीसाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे.
N.Sapre/N.Chitale/ P.Malandkar
(Release ID: 1547847)
अभ्यागत कक्ष : 145