संरक्षण मंत्रालय
लक्ष्यभेदी हल्ल्याच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रम
प्रविष्टि तिथि:
27 SEP 2018 4:41PM by PIB Mumbai
मुंबई, 27 सप्टेंबर 2018
29 सप्टेंबर 2016 रोजी भारतीय लष्कराने केलेला लक्ष्यभेदी हल्ला आणि उरी इथे सैनिकांच्या बलीदानाचे स्मरण करण्यासाठी 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान महत्वाच्या लष्करी ठाण्यांवर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

2016 मध्ये उरी इथल्या हल्ल्यात 18 सैनिकांना हौतात्म्य आल्यानंतर 11 दिवसांनी भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये लक्ष्यभेदी हल्ला केला होता.
लष्कराच्या शौर्याचे दर्शन घडवण्यासाठी प्रदर्शनं, लक्ष्यभेदी हल्ल्याबाबत व्हिडिओ क्लिपिंग यासह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शालेय विद्यार्थ्यांनी भेट देण्यासाठी पाणबुड्या, जहाजं खुली ठेवण्याबाबत विचार सुरु आहे. आपल्या शूर सैनिकांच्या सन्मानासाठी शालेय विद्यार्थ्यांकरिता पत्र लेखन आणि पोस्टर बनवण्याची स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. 29 सप्टेंबरला बॅलार्ड पिअर येथे बॅन्डच्या धून सादर करण्यात येणार आहेत.
पश्चिम नौदल विभागाने मुंबई आणि गोवा येथे दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. बॅलार्ड पिअर येथे प्रदर्शनही भरवण्यात येणार आहे. युद्ध नौकेसाठी टायगर गेटवरुन प्रवेश राहील.
S.Tupe/N.Chitale/P.Malandkar
(रिलीज़ आईडी: 1547685)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English