मंत्रिमंडळ

भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान अमली पदार्थ, प्रतिबंधित औषधे यांच्या तस्करीविरोधात समझोता करार

Posted On: 26 SEP 2018 4:21PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाने भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान झालेल्या अमली पदार्थ, प्रतिबंधित औषधे यांच्या तस्करीविरोधातील  समझोता कराराला आज मंजुरी दिली. 

फायदे:-

या सामंजस्य करारामुळे दोन्ही देशातील अमली पदार्थ आणि प्रतिबंधक औषधे यांच्या तस्करीविरोधातील कारवाईला बळ मिळणार आहे. तसेच यामुळे दोन्ही देशातील या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सरकारी संस्थांमधील परस्पर सहकार्य वाढीस लागेल. या करारामुळे अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी आटोक्यात येऊ शकेल.  

 ***

N.Sapre/M.Chopade/P.Malandkar



(Release ID: 1547398) Visitor Counter : 54