आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती
हॉटेल गुलमर्ग अशोक, गुलमर्ग आणि हॉटेल पाटलीपुत्र अशोक, पटनाच्या अपूर्ण प्रकल्पांच्या निर्गुंतवणूकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
Posted On:
26 SEP 2018 4:46PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2018
भारत सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणानुसार ITDC च्या गुलमर्ग अशोक आणि पाटलीपुत्र अशोक या अपूर्ण प्रकल्पांचेअनुक्रमे जम्मू आणि काश्मीर आणि बिहार या राज्यांकडे हस्तांतरण करून त्यांची निर्गुंतवणूक करण्याला नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
पार्श्वभूमी :-
भारत सरकारच्या निर्गुंतवणूक धोरणानुसार भारतीय पर्यटन विकास महामंडळाचे अपूर्ण प्रकल्प, हॉटेल्स संबधित राज्यांबरोबर भागीदारी करून लीज वर देण्यात येतील आणि जिथे राज्य सरकारला हे धोरण मंजूर नसेल तिथे राज्य सरकारने ठरवलेल्या किमतीवर या मालमत्ता राज्य सरकारला सोपवण्यात येतील. हॉटेल्स चालवणे हे सरकारचे काम नाही या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.
या धोरणानुसार हॉटेल लेक व्ह्यू अशोक, भोपाळ, हॉटेल ब्रह्मपुत्रा अशोक, गुवाहाटी, हॉटेल भरतपूर अशोक, भरतपूर, हॉटेल ललिथा महाल पॅलेस, मैसूर, हॉटेल डॉनयी पोलो अशोक, इटानगर, हॉटेल जयपूर, अशोक जयपूर संबंधित राज्यांना आणि हॉटेल जनपथ नवी दिल्ली (गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालय) यांना सोपवण्यात येतील.
N.Sapre/M.Chopade/P.Malandkar
(Release ID: 1547352)