आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

विमानतळ पायाभूत सुविधांना प्रोत्साहन

पटना विमानतळावर देशांतर्गत टर्मिनल इमारत आणि इतर बांधकामांच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

प्रविष्टि तिथि: 26 SEP 2018 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  26 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या वित्तीय व्यवहार विषयक समितीने आज पटना विमानतळ परिसरात नवी देशांतर्गत टर्मिनल इमारत आणि इतर बांधकामांना मंजुरी दिली. यासाठी 1216.90 कोटी रुपयांचा निधी अपेक्षित आहे.

परिणाम:-

या टर्मिनल इमारतीमुळे विमानतळाची वार्षिक प्रवासी क्षमता 4.5 दशलक्ष प्रवाशांपर्यंत वाढणार आहे. सध्या या विमानतळाची क्षमता 0.7 दशलक्ष प्रवासी इतकी आहे. नव्या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ 65,155 चौरस मीटर असेल आणि यात जागतिक दर्जाच्या प्रवासी सुविधा असतील. टर्मिनल इमारतीमुळे पटना परिसरात वित्तीय घडामोडींना वेग येईल. त्यातून रोजगार निर्मितीही होईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारसाठी घोषित केलेल्या पॅकेज अंतर्गत हा प्रकल्प राबवला जाणार आहे.

पार्श्वभूमी:-

बिहारमध्ये असलेले पटना विमानतळ पूर्व भारतातील महत्वाचे विमानतळ आहे. सध्या या विमानाच्या क्षमतेपेक्षा चौपट प्रवासी इथून प्रवास करत असल्यामुळे विमानतळाचे विस्तारीकरण करण्याची मागणी अनेकांनी केली होती. त्याला अनुसरुन हा निर्णय घेण्यात आला.   

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 


(रिलीज़ आईडी: 1547306) आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English