श्रम आणि रोजगार मंत्रालय
“अटल बिमित व्यक्ती कल्याण योजने”चे लाभ तीन कोटीपेक्षा जास्त विमाधारकांना होणार
Posted On:
26 SEP 2018 3:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 सप्टेंबर 2018
केंद्र सरकारने नव्याने सुरु केलेल्या “अटल बिमित व्यक्ती कल्याण योजने”चा लाभ 3.2 कोटी विमाधारकांना होणार आहे. कर्मचारी राज्य विमा कायदा 1948 अंतर्गत सर्व विमाधारक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल. कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ आली आणि ते नवीन कामाच्या शोधात असतानाच्या काळात त्यांना आर्थिक मदत म्हणून ही विम्याची रक्कम रोख स्वरुपात अथवा बँक खात्यात जमा केली जाईल. या अंतर्गत बेरोजगार व्यक्तीला त्याच्या 90 दिवसांच्या सरासरी उत्पन्नाच्या 25 टक्के रक्कम दिली जाईल, अशी माहिती केंद्रीय श्रम आणि रोजगार राज्यमंत्री संतोष कुमार गंगवार यांनी दिली. नवी दिल्लीत आज “कार्यालयीन जागेवर सुरक्षितता तसेच सर्वोत्कृष्ट सुरक्षा व्यवस्था” पुरस्कार समारंभात ते बोलत होते.
असंघटित क्षेत्रातल्या सुमारे 6 कोटी कामगारांना ईपीएफओ, ईएसआयसी आणि इतर सामाजिक सुरक्षा योजनांचा लाभ मिळतो आहे. कामगारांच्या कामाच्या ठिकाणी योग्य वातावरण असावे तसेच सुरक्षिततेसाठी सरकारने केलेल्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली. प्रधानमंत्री रोजगार प्रोत्साहन योजनेच्या माध्यमातून देशात रोजगाराच्या संधी वाढवण्याचे सरकारचे प्रयत्न सुरु आहेत असे ते म्हणाले.
N.Sapre/R.Aghor/P.Malandkar
(Release ID: 1547293)