अर्थ मंत्रालय

वित्तीय समावेशनाचा भाग म्हणून वित्त मंत्रालयाकडून “जन धन रक्षक” मोबाईल ॲपचे उद्‌घाटन

Posted On: 26 SEP 2018 12:48PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  26 सप्टेंबर 2018

 

केंद्रीय वित्त मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी संयुक्तरित्या सर्वसामान्य नागरिकांसाठी जन धन रक्षक नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. सरकारच्या वित्तीय समावेशनाचा भाग म्हणून, जनतेला आर्थिक सुविधांची माहिती देण्यासाठी, हे ॲप सुरु करण्यात आले आहे.

या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे त्यावर सर्व बँका आणि वित्तीय सेवांची माहिती जनतेला त्यांच्या मोबाईलवर हव्या त्या ठिकाणी मिळू शकेल. ग्राहक-केंद्री अशा या ॲपवर बँका, पोस्ट ऑफिस, सी एस सी अशा सर्व संस्थांची माहिती आणि त्यांचे स्थळ मिळू शकेल. जनतेच्या गरजा आणि सोयींनुसार या ॲपचा वापर करता येईल.

ग्राहकाच्या जागेपासून जवळ असणाऱ्या वित्तीय सेवा जसे एटीएम, पोस्ट ऑफिस, बँक शाखा यावर कळू शकतील. बँकांच्या विविध शाखांचे दूरध्वनी क्रमांक उपलब्ध असतील, शिवाय त्यावरुन बँकांशी थेट संपर्कही साधता येईल.

ग्राहकांनी यावर दिलेला प्रतिसाद, तक्रारी थेट संबंधित वित्तीय संस्थांकडे जातील, जेणेकरुन त्यांना आपल्या कार्यपद्धतीत बदल करता येतील.

 

N.Sapre/R.Aghor/P.Malandkar



(Release ID: 1547274) Visitor Counter : 89


Read this release in: English