गृह मंत्रालय
विशेष संरक्षण पथकाबाबत राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात स्पष्टीकरण
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2018 2:34PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2018
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या एसपीजी म्हणजेच विशेष संरक्षण पथकाच्या प्रमुखांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडलेल्या व्यक्तींचा या पथकात अधिकारी म्हणून समावेश करण्यास नकार दिल्यामुळे त्यांना या पदाचा राजीनामा द्यावा लागला’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी शनिवारी (22 सप्टेंबर 2018) नवी दिल्लीत केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केले आहे.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्याची शहानिशा करण्यात आली आहे. त्यांनी उल्लेख केलेले अधिकारी, एसपीजीचे माजी संचालक विवेक श्रीवास्तव यांनी यासंदर्भात खुलासा केला असून त्यांचे राहुल गांधी यांच्याशी कधीही अशा प्रकारचे बोलणे झाले नाही असे त्यांनी म्हटले आहे. एसपीजीच्या इतर अधिकाऱ्यांची त्यांचे व्यवसायानिमित बोलणे होत असते. मात्र, राहुल गांधी यांच्याशी बोलतांना, नव्या संचालकांची नियुक्ती अथवा त्यांनी पद सोडण्याविषयी कधीही चर्चा झालेली नाही असे श्रीवास्तव यांनी स्पष्ट केले.
एसपीजी ही एक व्यावसायिक संस्था असून पंतप्रधान, माजी पंतप्रधान आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेची जबाबदारी या संस्थेकडे आहे. या पथकाविषयी राहुल गांधी यांनी केलेले वक्तव्य निराधार, तथ्यहीन आणि दुर्दैवी असल्याचे गृह मंत्रालयाने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
N.Sapre/R.Aghor/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1547049)
आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English