रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय

नितीन गडकरी 24 आणि 25 सप्टेंबर रोजी शिलाँगच्या दौऱ्यावर

Posted On: 21 SEP 2018 5:22PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 21 सप्टेंबर 2018

 

रस्ते वाहतूक आणि महामार्ग, नौवहन जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन मंत्री नितीन गडकरी 24 आणि 25 सप्टेंबर रोजी शिलाँगच्या दौऱ्यावर जाणार असून इशान्येकडील सात राज्यांमधून राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचा आढावा घेणार आहेत. या सात राज्यांमधून सध्या 1.5 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत.

24 सप्टेंबर रोजी गडकरी मेघालयमधील शिलाँग येथे राष्ट्रीय महामार्ग 6 च्या जोवई-रताचेरा या टप्प्याचं लोकार्पण करतील. या मार्गामुळे सध्या लागणारा चार तासांचा वेळ अडीच तासापर्यंत कमी होईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1546914) Visitor Counter : 57


Read this release in: English