युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार-2018 ची घोषणा, मीराबाई चानू आणि विराट कोहली यांना राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर

Posted On: 20 SEP 2018 3:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  20 सप्टेंबर 2018

 

क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी दरवर्षी राष्ट्रीय पुरस्कार दिले जात आहेत. यावर्षीच्या विविध क्रीडा पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. हे पुरस्कार पुढील प्रमाणे:-

  1. राजीव गांधी खेलरत्न-2018
  • एस. मीराबाई चानू- भारोत्तोलन
  • विराट कोहली- क्रिकेट
  1. द्रोणाचार्य पुरस्कार– 2018
  • सुभेदार चेनंदा अच्चय्या कुटप्पा– मुष्टियुद्ध
  • विजय शर्मा– भारोत्तोलन
  • ए. श्रीनिवास राव- टेबल टेनिस
  • सुखदेव सिंग पन्नू- धावपटू
  • क्लॅरेन्स लोगो- हॉकी (जीवनगौरव)
  • तारक सिन्हा- क्रिकेट (जीवनगौरव)
  • जीवन कुमार शर्मा- ज्युडो ( जीवनगौरव)
  • व्ही.आर.बीडू- धावपटू (जीवनगौरव)
  1. अर्जुन पुरस्कार- 2018
  • नीरज चोप्रा-धावपटू
  • नायब सुभेदार जीनसन जॉनसन-धावपटू
  • हीमा दास- धावपटू
  • नेलाकुरथी सिक्की रेड्डी- बॅडमिंटन
  • सुभेदार सतीश कुमार- मुष्टियुद्ध
  • स्मृती मानधना- क्रिकेट
  • शुभंकर शर्मा- गोल्फ
  • मनप्रित सिंग-हॉकी
  • सविता-हॉकी
  • कर्नल रवी राठोड- पोलो
  • राही सरनोबत- नेमबाजी
  • अंकुर मित्तल- नेमबाजी
  • श्रेयसी सिंग- नेमबाजी
  • मनिका बत्रा- टेबल टेनिस
  • जी. साथियन- टेबल टेनिस
  • रोहन बोपन्ना- टेनिस
  • सुमित- कुस्ती
  • पुजा कडियन- वुशू
  • अंकूर धामा- पॅरा ॲथलिटिक्स
  • मनोज सरकार- पॅरा बॅडमिंटन
  1. ध्यानचंद पुरस्कार- 2018
  • सत्यदेव प्रसाद- तिरंदाजी
  • भारत कुमार छेत्री- हॉकी
  • बॉबी अलॉयसियस- धावपटू
  • चौगले दादू दत्तात्रय- कुस्ती
  1. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार- 2018
  • उदयोन्मुख आणि युवा प्रतिभेची निवड आणि प्रोत्साहन- राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
  • कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीच्या माध्यमातून खेळांना प्रोत्साहन- जेएसडब्ल्यू स्पोर्टस्
  • विकासासाठी खेळ- इशा आउटरीच
  1. मौलाना अबुल कलाम आजाद चषक 2017-18
  • गुरु नानक देव विद्यापीठ, अमृतसर

            राष्ट्रपती भवनात 25 सप्टेंबर 2018 रोजी होणाऱ्या विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. साडे सात लाख रुपये रोख, पदक आणि प्रमाणपत्र असे राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे स्वरुप आहे. अर्जुन, द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रमाणपत्र दिले जातील. राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार विजेत्यांना चषक आणि प्रमाणपत्र दिले जाईल. आंतर विद्यापीठ स्पर्धेत अव्वल कामगिरी करणाऱ्या विद्यापीठाला मौलाना अबुल कलाम आजाद चषक, 10 लाख रुपये रोख आणि प्रमाणपत्र दिले जाईल.

 

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 

 



(Release ID: 1546811) Visitor Counter : 304


Read this release in: English