पंतप्रधान कार्यालय

देशभरातून अंगणवाडी कामगारांतर्फे पंतप्रधानांना दूरध्वनी

Posted On: 19 SEP 2018 7:35PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

देशभरातील १०० अंगणवाडी कामगारांच्या समूहाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून त्यांच्या मानधनात करण्यात आलेल्या वाढीसाठी तसेच इतर सेवांबाबत केलेल्या घोषणांसाठी  समाधान व्यक्त केले.

पंतप्रधानांनी, देशभरातून अंगणवाडी कामगार त्यांना आज  भेटायला एकत्रित आल्याबद्दल समाधान व्यक्त केले.

मुलांच्या शारीरिक आणि संज्ञानात्मक विकासात पौष्टिकतेच्या  महत्वावर  पंतप्रधानांनी जोर दिला. त्यांनी या संदर्भात आंगणवाडी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण भूमिका बजावण्यास  सांगितले. ते पुढे म्हणालेत की, पोषण महिना चालू असताना, या महिन्यादरम्यान पोषण मोहीम राबविण्यासाठी  घेतलेला वेग खंडित होऊ नये.

त्यांनी सांगितले की, पौष्टिकतेसाठी सतत लक्ष केंद्रित करणे आणि चांगल्या सवयींचा विकास करणे आवश्यक आहे, जे अंगणवाडी कार्यकर्त्यांद्वारे केले  जाऊ शकते. लाभार्थ्यांना नियमाद्वारे पोषक सहाय्य उपलब्ध करुन देण्याबाबत त्यांनी विनंती केली.

मुलांवर अंगणवाडी कार्यकर्त्यांचा जास्त प्रभाव असतो कारण जागरूकता प्रस्थापित करण्यात त्यांचा महत्वाचा वाट असतो. पंतप्रधानांनी  या कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धात्मक दृष्टिकोन ठेवल्यास जास्त पोषाणात्मक काळजी आणि प्रयत्न केल्या जाऊ शकतील असे सांगितले.

केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री मनेका गांधी यावेळी उपस्थित होत्या.

 

 

B.Gokhale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1546794) Visitor Counter : 78


Read this release in: English