कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

कौशल्य भारत अभियानाचे राजदूत म्हणून वरुण धवन आणि अनुष्का शर्मा करारबद्ध

Posted On: 19 SEP 2018 5:41PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

हिंदी चित्रपट अभिनेते वरुण धवन आणि अनुष्का शर्मा यांची कौशल्य भारत अभियानाचे राजदूत म्हणून निवड करण्यात आली आहे. या दोघांनी सुई धागा -मेड इन इंडिया या चित्रपटाद्वारे देशातील छोट्या कारागिरांचे कौशल्य आणि त्यांना भेडसावणारी आव्हानं यांचे दर्शन घडवले आहे. हे दोघे जण देशाच्या कुशल गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी आपला अमूल्य वेळ व्यतीत करतील. या दोघांची कौशल्य भारत अभियानाची राजदूत म्हणून निवड झाल्यानंतर युवकांना कौशल्य प्रशिक्षण घेऊन उदरर्निवाहाचे उत्तम साधन निवडण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 


(Release ID: 1546724) अभ्यागत कक्ष : 142
Read this releasein: English