आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

आंगणवाडी सेविका,आंगणवाडी सहाय्यिका आणि आंगणवाडी सेवाअंतर्गत आंगणवाडी सहाय्यिकांसाठीच्या, कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्त्यात वाढ करायला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 SEP 2018 4:19PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

आंगणवाडी सेविका, आंगणवाडी सहाय्यिका आणि आंगणवाडी  सहाय्यिकांसाठीच्या(एकात्मिक बाल विकास सेवा, छत्री योजनेअंतर्गत), कामगिरीवर आधारित प्रोत्साहन भत्त्यात वाढ करायला मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने मंजुरी दिली आहे. 01.10.2018 ते 31.03.2020 या काळासाठी 10,649.41 कोटी रुपये एकूण खर्च होणार आहे.

सुमारे 27 लाख आंगणवाडी सेविका, आणि आंगणवाडी सहाय्यिकांना याचा लाभ होणार आहे. आंगणवाडी  सेवा (एकात्मिक बाल विकास सेवा, छत्री योजना ) ही सार्वत्रिक योजना असून या योजनेचे लाभार्थी,देशभरात,एडब्लूसी/ ग्रामीण स्तरापर्यंत सर्वत्र पसरलेले आहेत.

तपशील :-

आंगणवाडी सेविकांना या आधी  दरमहा 3000 रुपये मिळत होते त्यात वाढ होऊन आता त्यांना 4500 रुपये, आंगणवाडी सेविका (मिनी-एडब्लूसी) यांना आता दरमहा 2,250 रुपयांऐवजी 3500 रुपये,आंगणवाडी सहाय्यिकांना दरमहा 1500 रूपयांवरून आता 2250 रुपये मिळणार आहेत. या 2250 रुपयांव्यतिरिक्त आंगणवाडी सहाय्यिकांसाठी, कामगिरीवर आधारित मासिक 250 रुपयांनाही मंजुरी देण्यात आली.

1 ऑक्टोबर  2018 पासून ही वाढ लागू होणार आहे.

परिणाम :-

या कार्यक्रमामुळे कुपोषण, रक्तक्षय, कमी वजनाची बालके यासारख्या समस्या कमी होण्यासाठी मदत होणार असून किशोरवयीन बालिकांचे सशक्तीकरण, कायद्याच्या प्रक्रीये अंतर्गत असणाऱ्या बालकांना संरक्षण सुनिश्चित होणार आहे. याशिवाय नियोजित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आणि अधिक पारदर्शकताआणण्यासाठी संबंधित मंत्रालय आणि राज्य/केंद्र शासित प्रदेश यांच्यात समन्वय आणि योग्य दिशा निर्देश जारी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात देखरेख ठेवण्यासाठीची व्यवस्था अधिक उत्तम करता येणार आहे.

  

N.Sapre/ N.Chitale/P.Malandkar

 



(Release ID: 1546694) Visitor Counter : 105


Read this release in: English