आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

आशा सेविकांच्या पॅकेजला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 SEP 2018 3:51PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

आशा सेविकांच्या,ऑक्टोबर 2018 पासून लागु होणाऱ्या  आणि नोव्हेंबर मधे देण्यात येणाऱ्या लाभकारी  पॅकेजला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत झालेल्या मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीच्या बैठकीत पूर्व लक्षी प्रभावाने मान्यता देण्यात आली.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, या केंद्रसरकारच्या सामाजिक सुरक्षा योजना अंतर्गत नोंदणीसाठीचे निकष या आशानी पूर्ण केलेले असावेत.

राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत आशा कार्यकर्त्याच्या मासिक 1000 रुपयांत वाढ करून आता  2000रुपये करण्यात आले आहे.  2018-19 आणि 2019-20 या वर्षासाठी 1224.97 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.  सुमारे 1,06,36,701 आशा आणि आशा सहाय्यक  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेअंतर्गत येतात. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेअंतर्गत सुमारे 9,57,303 अशा आणि आशा सहाय्यक येतात.

सुमारे  10,22,265 आशांना दैनंदिन कामासाठीच्या  आताच्या मासिक  1000 रुपयांवरून किमान 2000 रुपये मिळणार आहेत. केंद्र आणि राज्य स्तरावर, कामावर आधारीत  दिल्या जाणाऱ्या प्रोत्साहन भत्त्याखेरीज ही रक्कम आहे. आशासाठीचे  हे  पॅकेज राबवण्यासाठी,राष्ट्रीय आरोग्य अभियानाची सध्याची संस्थात्मक यंत्रणा उपयोगात आणली जाणार आहे.

 

N.Sapre/ N.Chitale/P.Malandkar

 

 



(Release ID: 1546671) Visitor Counter : 106


Read this release in: English