आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समिती

तालचेर फर्टीलायझरर्स लिमिटेडमध्ये आरसीएफच्या समभाग गुंतवणुकीला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 19 SEP 2018 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  19 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने तालचेर फर्टीलायझरर्स लिमिटेड (TFL) मध्ये कोल गॅसिफिकेशन आधारित खत प्रकल्प उभारण्यासाठी राष्ट्रीय केमिकल्स ॲण्ड फर्टीलायझरर्स लिमिटेडद्वारे एकूण प्रकल्प खर्चाच्या 29.67 टक्के प्रमाणे 1033.54 कोटी रुपयांच्या समभाग गुंतवणुकीच्या खते विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली.

तालचेर प्रकल्पाच्या पुनरुज्जीवनामुळे खत क्षेत्रात सरकारकडून मोठी गुंतवणूक होऊ शकेल. यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील तसेच राज्ये आणि पूर्वेकडील भागाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. त्याचबरोबर या प्रकल्पामुळे युरीयाच्या देशी उत्पादनात वाढ होऊन युरियामध्ये अधिक स्वयंपूर्णता येईल.

 

N.Sapre/ S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1546666) Visitor Counter : 59


Read this release in: English