सांस्कृतिक मंत्रालय

महात्मा गांधी यांच्या दिडशेव्या जयंतीनिमित्त लोगो आणि वेब पोर्टलचा राष्ट्रपतींच्या हस्ते शुभारंभ

Posted On: 18 SEP 2018 5:43PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  18 सप्टेंबर 2018

 

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज राष्ट्रपती भवन येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त लोगो आणि वेब पोर्टलचा शुभारंभ केला. (http://gandhi.gov.in/) यावेळी सांस्कृतिक आणि पर्यावरण, वने आणि हवामान बदल राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा आणि सांस्कृतिक सचिव अरुण गोयल उपस्थित होते.

क्राउड सोर्सिंगच्या माध्यमातून हा लोगो मिळवण्यात आला. रेल्वे, मेट्रो, एअर इंडिया विमाने, राज्य रस्ते महामंडळाच्या बसेस, सरकारी संकेतस्थळे, ई-मेल्स, सरकारी दिनदर्शिका आणि डायरी, सरकारी जाहिराती, डिजिटल्स सही याद्वारे लोगोचे ब्रँडिंग केले जाईल. मंत्रालये/विभागांतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम, संलग्न कार्यालये, स्वायत्त संस्था देखील या लोगोचा वापर करु शकतील.

https://gandhi.gov.in/download.html या संकेतस्थळावरुन लोगो डाऊनलोड करता येईल.

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar



(Release ID: 1546542) Visitor Counter : 97


Read this release in: English