विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पासह दोन विशिष्ट प्रकल्पांचे केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्र्यांच्या हस्ते उद्‌घाटन

Posted On: 18 SEP 2018 3:14PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  18 सप्टेंबर 2018

 

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज नवी दिल्लीतील सन डायल पार्क येथे सांडपाणी पुर्नवापर प्रकल्पाचे उद्‌घाटन केले. या प्रकल्पाअंतर्गत तयार होणाऱ्या स्वच्छ पाण्याचा वापर विविध उपक्रमांसाठी करता येणार आहे.

डॉ. वर्धन यांनी डीबीटी-बिराक आणि बील आणि मिलींदा गेट्स फाउंडेशनद्वारा प्रायोजित दोन जैव शौचालयांचे उद्‌घाटनही केले. स्वच्छ भारत अभियानाने निर्धारित केलेली उद्दिष्ट गाठण्याचा हा प्रयत्न आहे.

या प्रायोगिक प्रकल्पात सहभागी झालेले संशोधक आणि वैज्ञानिकांचे त्यांनी अभिनंदन केले. कचऱ्याचा सदुपयोग कसा करावा याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे त्यांनी सांगितले. 10 लाख लीटर सांडपाण्याचे स्वच्छ पाण्यात रुपांतर करण्याची या प्रकल्पाची क्षमता असून यातून 3 टन जैव इंधन तयार होणार आहे. संपूर्ण जगासाठी हे आदर्श उदाहरण ठरेल असे डॉ. वर्धन म्हणाले.

आणखी एका वेगळ्या उपक्रमांतर्गत जैव तंत्रज्ञान विभागाने नापीक आणि वापरात नसलेल्या जमीनीवर वनीकरणाची मोहिम हाती घेतली आणि 2,281 झाडे लावली. यामुळे डासांचे प्रजनन कमी झाले तसेच हवा आणि जमिनीची प्रतही सुधारली.  ‍ि

 

N.Sapre/S.Kane/P.Malandkar

 

 

 



(Release ID: 1546495) Visitor Counter : 85


Read this release in: English