पंतप्रधान कार्यालय

वाराणसी शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, वाराणसीमधील विकास कामांचे पंतप्रधानांनी केले मूल्यांकन

Posted On: 17 SEP 2018 11:58PM by PIB Mumbai

नवी दिल्ली,  17 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जवळपास ९० मिनिटे त्यांच्या वाराणसी मतदार संघातील शालेय विद्यार्थ्यांशी  संवाद साधून विचारांची देवाण घेवाण केली. तसेच त्यांनी  विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना, वाराणसीमधील विकास कामांचे मूल्यांकन  केले.

नारुर खेड्यातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी  पंतप्रधानांच्या आगमनानंतर त्यांचे उत्साहाने स्वागत केले.  पंतप्रधानांनीही विश्वकर्मा जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आणि विविध कौशल्य आत्मसात करण्या मागील महत्व विशद केले.

पंतप्रधानांनी मुलांना न भिता प्रश्न विचारण्यास सांगितले ते म्हणाले कि,  हीच खरी यशाची गुरुकिल्ली आहे. पंतप्रधानांनी " रूम टू रीड " या स्वयं सेवी संस्थांच्या मुलांबरोबरही  वेळ घालविला.

त्यानंतर त्यांनी डीएलडब्लू वाराणसी येथिल गरीब आणि वंचित मुलांबरोबर संवाद साधला. हि मुले कशी विद्यापीठाला साहाय्य करतात. पंतप्रधानांनी त्यांना अभ्यासासाठी मेहनत आणि क्रीडा क्षेत्रात रुची निर्माण करण्याचा सल्ला दिला.

संध्याकाळी पंतप्रधानांनी वाराणसीच्या रस्त्यांवरून फेरफटका मारतांना वाराणसीच्या विकास कामाचा आढावा घेऊन मूल्यमापन केले. त्यांनी काशी विश्वनाथ मंदिरात प्रार्थनेसाठी  काही मिनिटे घालवली तसेच त्यांनी माण्डूडीह  रेल्वे  स्थानकाला अचानक भेट दिली.

 

 

B.Gokhale

 

 

 

 

 

 

 

 



(Release ID: 1546467) Visitor Counter : 47


Read this release in: English