अर्थ मंत्रालय

सरकारने भारताच्या तीन सर्वाधिक मोठ्या बँकांच्या विलीनीकरणासाठी उचलली पावले


तीन मोठ्या बँकांच्या विलीनीकरणाची प्रक्रिया सुरु

प्रविष्टि तिथि: 17 SEP 2018 7:30PM by PIB Mumbai

मोठ्या प्रमाणावर उत्पादन आणि सेवा तसेच जागतिक लाभाचा दृष्टिकोन बाळगून प्रवेशाला प्रोत्सहन देण्याच्या उद्देशाने वित्तमंत्री अरुण जेटली , केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि निर्मला सीतारामन यांनी पर्यायी यंत्रणेची ओळख करून देण्यासाठी आज एकत्रित भेट घेतली. भारताच्या तीन सर्वाधिक बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय त्यांनी घेतला. या तीन बँकांमध्ये बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँकेचा समावेश आहे. विलीनीकरणाचा हा निर्णय १४. ८२ लाख कोटी एकत्रित व्यापाराचे उद्दिष्ट ठेवून घेण्यात आला असून याद्वारे भारतात तिसरी सर्वाधिक मोठी बँक कार्यरत होणार आहे.

एकत्रित बँकेमुळे जागतिक बँकेतील स्पर्धेला आर्थिक आणि विस्तारित दृष्टिकोनातून तोंड देता येईल. नेटवर्कचे फायदे , कमी किमतीच्या ठेवी आणि तीन बँकांच्या विविध शाखा यामुळे संभाव्य विशेष सहकार्य मिळणार आहे. ग्राहक संबंधी सेवा , बाजारपेठेपर्यंत पोहोच, परिचालन कार्यक्षमता , व्यापक उत्पादन सेवा आणि त्वरित ग्राहक भेट यामध्ये वाढ होईल.

बँकांच्या विलीनीकरणाला प्रोत्सहनासाठीचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे:

 

१. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या सरासरीच्या (६३.७% च्या ) तुलनेत प्रोव्हिजन कव्हरेज रेशो ६७.५ %असून तो संथ गतीने वाढत आहे.

२. निव्वळ अनुत्पादित मालमत्ता गुणोत्तर एनपीए रेशो हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या १२.१३ % च्या तुलनेत ५.७१ % आहे. आणि तो कमी कमी होत आहे.

३. पहिल्या तिमाहीत एकत्रित उद्योगांचा सकल अनुत्पादित मालमत्ता अर्थात ग्रॉस एनपीए १०४८ कोटी रुपयांवरून घटली आहे.

४. सार्वजनिक बँकांच्या सरासरी ५३.९२%च्या तुलनेत संयुक्त उद्योगांचे उत्पादित गुणोत्तर मूल्य (कॉस्ट टू इन्कम रेशो) ४८.९४ % आहे.

५. एमएसएमई उद्यमीमित्र साठी विलीनीकरण झालेल्या इतर दोन बँकांची स्थिती बळकट करण्यासाठी देना बँकेद्वारे एमएसएमई क्षेत्र सशक्त करण्यावर भर देण्यात येणार आहे.

६. भांडवली बाजारपेठेचे फायदे घेण्यासाठी  पर्याप्त भांडवल गुणोत्तर अर्थात कॅपिटल अडिकवेसी रेशो हा सध्या नियामक दराच्या १०.८७५ % पेक्षा १२.२५% आहे.

७. सहकार्यातून विशेष मूल्य फायदा - विलीनीकरण झालेल्या बँकेला, ग्राहकाना आणि त्यांच्या शाखांना परिचालन , वितरण मूल्याचे फायदे मिळावे यासाठी मोठ्या प्रमाणावरील वितरण नेटवर्कमध्ये कपात करण्यात येणार आहे.

८. जागतिक नेटवर्कद्वारे बँक ऑफ बडोद्याला बळकट करणे - विजया आणि देना बँकेच्या ग्राहकांना बँक ऑफ बडोद्याच्या जागतिक नेटवर्कचा फायदा मिळावा यासाठी प्रयत्न

९. नेटवर्कच्या  विलीनीकरणाद्वारे बँकिंग नेटवर्कमध्ये सुधारणा

१०. बँकांच्या शाखांना आणि मोठ्या नेटवर्कद्वारे उत्पादन आणि सेवांचे मोठ्या प्रमाणावर फायदे मिळावे यासाठी मूल्यवर्धित गैरबँकिंग सेवा आणि उत्पादनांची तरतूद

***

BG/SK


(रिलीज़ आईडी: 1546438) आगंतुक पटल : 191
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English