मंत्रिमंडळ

तेल आणि वायूच्या वाढीव उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणात्मक आराखड्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 SEP 2018 7:02PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने तेल आणि वायूच्या देशांतर्गत उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी सध्याच्या हायड्रोकार्बन साठा सुधारण्यासाठी वाढीव शोधकार्य/ अपारंपरिक हायड्रोकार्बनच्या उत्पादन पद्धती/ तंत्र उत्तम बनवण्यासाठी  धोरणात्मक आराखड्याला मंजुरी दिली

अपारंपरिक हायड्रोकार्बन उत्पदनाच्या पद्धतींमध्ये  शेल ऑयल आणि गॅस उत्‍पादन,  टाइट ऑयल आणि  गॅस, शेल, गॅस हाइड्रेट्स आणि जड तेलापासून उत्पादनाचा समावेश आहे. साठा वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणि जटिल तंत्रज्ञान याची आवश्यकता असते. यासाठी  सहायक पायाभूत विकास, लॉजिस्टिक सहकार्य, आर्थिक  प्रोत्‍साहन आणि अनुकूल वातावरण तयार करणे गरजेचे असते.

या धोरणाचा उद्देश शैक्षणिक आणि संशोधन संस्था,  उद्योग आणि  शैक्षणिक संस्‍थामध्ये उत्तम ताळमेळाच्या माध्यमातून पूरक वातावरण तयार करणे, शोध आणि उत्पादन कंत्राटदारांना ईआर/आईआर/यूएचसी व्‍यवस्‍था/प्रणालीचा वापर करण्यासाठी मदत आणि प्रोत्साहन देणे हा आहे. यामुळे नवीन गुंतवणूक वाढणे, आर्थिक घडामोडीना वेग तसेच अतिरिक्त रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची आशा आहे. या धोरणामुळे सध्याच्या क्षेत्रातील उत्पादकता सुधारण्यासाठी नवीन, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आणि तंत्रज्ञानविषयक सहकार्याला प्रोत्साहन मिळेल.

जुन्या तेल विहिरींमध्ये उत्तम तंत्रज्ञानाचा वापर करून हायड्रोकार्बन उत्पादनात वाढ करता येईल. यामुळे मूळ उत्पादनात ५ टक्के वाढ होऊन पुढील २० वर्षात १२० दशलक्ष मेट्रिक टन अतिरिक्त तेल उत्पादन अपेक्षित आहे. वायूच्या उत्पादनातही ३ टक्के वृद्धीदराने पुढील २० वर्षात ५२ बीसीएम अतिरिक्त वायू उत्‍पादन अपेक्षित आहे.

 

N.Sapre/S.Kane/P.Kor



(Release ID: 1545894) Visitor Counter : 98


Read this release in: English