मंत्रिमंडळ

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कायदा, 2014 मध्ये सुधारणा कराराला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 SEP 2018 6:23PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन कायदा 2014 च्या अधिकार क्षेत्रात चार नव्या एनआयडी आणण्यासाठी, एनआयडी कायदा 2014 मध्ये सुधारणा करण्यासाठीचे विधेयक संसदेत मांडण्यासाठी मंजुरी देण्यात आली. यात एनआयडी अमरावती/विजयवाडा, आंध्रप्रदेश, एनआयडी भोपाळ, मध्य प्रदेश, एनआयडी जोरहाट, आसाम आणि एनआयडी कुरूक्षेत्र, हरियाणा यांचा समावेश आहे. या संस्थांना एनआयडी अहमदाबादप्रमाणे राष्ट्रीय महत्वाच्या संस्था घोषित करण्याचा प्रस्तावही या विधेयकात आहेत. एनआयडी विजयवाडाचे नाव बदलून एनआयडी अमरावती करण्याचा प्रस्तावही सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबरच प्रमुख डिझाईनरचे पद प्राध्यापकाच्या समतुल्य करण्यासंदर्भातला प्रस्तावही विधेयकात आहे.

 

N.Sapre/S.Kakde/P.Kor



(Release ID: 1545858) Visitor Counter : 84


Read this release in: English