मंत्रिमंडळ

डिजिटल अर्थव्यवस्था निर्माणासाठी एक्झिम बँकेच्या ब्रिक्स देशांच्या बँकांबरोबरील सहकार्यातून डिस्ट्रीब्युटेड लेजर आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानाच्या संशोधनाला मंत्रिमंडळाची मंजुरी

Posted On: 12 SEP 2018 6:20PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने डिस्ट्रीब्युटेड लेजर आणि ब्लॉक चेन तंत्रज्ञानातील संशोधनाद्वारे डिजिटल अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी एक्झिम बँकेने ब्रिक्स देशांच्या बँकांबरोबर स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य कराराला कार्योत्तर मंजुरी दिली. यामध्ये भारताची एक्झिम बँक, ब्राझीलची बीएनडीईएस बँक, चायना डेव्हलपमेंट बँक, स्टेट कॉर्पोरेशन बँक फॉर डेव्हलपमेंट ॲण्ड फॉरेन इकोनॉमिक अफेअर (रशिया) आणि डेव्हलपमेंट बँक ऑफ साऊथ आफ्रिका यांचा समावेश आहे.

 

प्रभाव

या तंत्रज्ञानाच्या विकासामुळे वित्तीय क्षेत्रातील बऱ्याच समस्यांचे निराकरण होईल. या समझोता कराराच्या माध्यमातून होणाऱ्या संशोधनामुळे बँकिंग क्षेत्रात चालणाऱ्या विभिन्न व्यवहारांना सुलभ करण्यास मदत होईल.

 

पार्श्वभूमी

चीनमध्ये संमत झालेल्या जियामेन घोषणेनुसार ब्रिक्स देशांनी डिजिटल अर्थव्यवस्थेचे वाढते महत्त्व लक्षात घेऊन त्यामधील संशोधनाला चालना देण्यासाठी ब्रिक्स देशांमधील अशा कराराचे महत्त्व अधोरेखित केले होते.

 

N.Sapre/M.Chopade/P.Kor


(Release ID: 1545857)
Read this release in: English