मंत्रिमंडळ

भारत आणि द. आफ्रिका दरम्यान अवकाशाच्या शांततामय वापरासाठी सामंजस्य करार

Posted On: 12 SEP 2018 6:19PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 12 सप्टेंबर 2018

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीला भारत आणि द. आफ्रिकादरम्यान झालेल्या अवकाशाच्या शांततामय वापरासाठीच्या सामंजस्य कराराची माहिती देण्यात आली. जोहान्सबर्गमध्ये 26 जुलै 2018 रोजी या करारावर स्वाक्षरी झाली होती.

 

ठळक वैशिष्ट्ये

समझोता करारानुसार खालील क्षेत्रांमध्ये सहकार्यावर भर राहील.

  1. रिमोट सेन्सिंग अर्थात सुदूर संवेदनाद्वारे पृथ्वीचा अभ्यास
  2. उपग्रह दळणवळण आणि उपग्रहाद्वारे मार्गक्रमण
  3. अवकाश विज्ञान आणि ग्रह-ताऱ्यांचा अभ्यास
  4. अवकाश यान, प्रक्षेपण यान, अवकाश विज्ञान, अवकाश आणि भू यंत्रणा यांचा वापर
  5. अवकाश तंत्रज्ञानाचा व्यवहारात वापर
  6. परस्पर संमतीने ठरविण्याचे इतर मुद्दे

खालील क्षेत्रात सहकार्य अंमलात आणले जाईल.

  • अवकाश मोहिमांचे संयुक्त नियोजन परस्पर सहमतीने ठरवणे.
  • अवकाश मोहिमांसाठीच्या पुरक भू केंद्रांची स्थापना, कार्यान्वयन आणि देखभाल
  • उपग्रह माहिती परिक्षणाचे परिणाम आणि इतर शासकीय माहितीची देवाणघेवाण
  • संयुक्त संशोधन आणि विकास उपक्रम
  • संयुक्त कार्यक्रमांसाठी तज्ज्ञ मनुष्यबळाची देवाणघेवाण
  • अवकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात क्षमता बांधणीवर भर
  • संयुक्त परिषदा आणि शास्त्रीय विषयांवरील बैठकींचे संयुक्त आयोजन

फायदे

या समझोता करारामुळे अवकाश विज्ञान, तंत्रज्ञान आणि त्यांचा व्यवहारात वापर अशा संभाव्य क्षेत्रात फायदे अपेक्षित आहेत.

 

N.Sapre/M.Chopade/P.Kor



(Release ID: 1545856) Visitor Counter : 74


Read this release in: English