पंतप्रधान कार्यालय

श्रीलंकेच्या संसदपटूंनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 10 SEP 2018 4:21PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2018

 

श्रीलंकेच्या संसद सदस्यांच्या प्रतिनिधी मंडळाने आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष कारू जयसूर्या यांच्या अध्यक्षतेखालील या प्रतिनिधीमंडळात विविध पक्षांचे खासदार आहेत.

भारत आणि श्रीलंका यांच्यात प्राचीन काळापासून संबंध असून दोन्ही देशांमध्ये समान अध्यात्मिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. गेल्या काही वर्षात दोन्ही देशांमधले संबंध अधिक दृढ झाल्याबद्दल प्रतिनिधी मंडळाने कौतुक केले. भारताच्या सहाय्याने श्रीलंकेत अनेक लोकाभिमुख विकास प्रकल्प सुरू आहेत, असेही त्यांनी नमूद केले. संयुक्त आर्थिक प्रकल्पांच्या जलद अंमलबजावणीमुळे दोन्ही देशांच्या अर्थव्यवस्थेला आणि नागरिकांना फायदा होईल, यावर त्यांनी सहमती दर्शवली.

पंतप्रधानांनी प्रतिनिधीमंडळाचे स्वागत केले आणि अशा प्रकारच्या संबंधांचे महत्व अधोरेखित केले. दोन्ही देशांमधल्या प्रांतिक सभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील संबंध दृढ करण्यासंदर्भातल्या नव्या उपक्रमांमुळे दोन्ही देशांमधल्या जनतेतले संबंध अधिक वृद्धींगत होतील आणि दोन्ही देशांमधला विश्वासही वाढेल.

 

B.Gokhale/S.Kakde/P.Kor



(Release ID: 1545517) Visitor Counter : 116


Read this release in: English