जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुत्थान मंत्रालय
देशातील महत्वाच्या 91 धरणांमधील पाणीसाठ्यात चार टक्के वाढ
प्रविष्टि तिथि:
07 SEP 2018 6:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 7 सप्टेंबर 2018
देशातील महत्त्वाच्या 91 धरणातल्या जलसाठ्यांमध्ये 6 सप्टेंबर 2018 रोजी संपलेल्या सप्ताहामध्ये 119.042 अब्ज घनमीटर पाणी शिल्लक असून, एकूण साठवणूक क्षमतेच्या ते 73 टक्के इतके आहे.
या जलसाठ्यांची एकूण साठवणूक क्षमता 161.993 अब्ज घनमीटर इतकी आहे. 91 पैकी 37 जलसाठ्यांवर 60 मेगावॅट पेक्षा जास्त क्षमतेचे जल विद्युत प्रकल्प उभारण्यात आले आहेत.
पश्चिम विभागात महाराष्ट्र आणि गुजरातचा समावेश असून यामध्ये 27 धरणांचा समावेश आहे. त्यांची एकूण जल साठवण क्षमता 31.26 अब्ज घनमीटर आहे. या साठ्यांमध्ये सध्या 17.85 अब्ज घनमीटर पाणी उपलब्ध आहे. धरणांच्या साठवणूक क्षमतेपैकी 57 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
झारखंड, ओदिशा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला जलसाठा उपलब्ध आहे. पंजाब, हिमाचल प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, त्रिपुरा आणि गुजरात या राज्यांतील जलसाठ्यांमधील पाण्याचे प्रमाण गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी आहे.
B.Gokhale/M.Pange/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1545356)
आगंतुक पटल : 103
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English