भूविज्ञान मंत्रालय

त्सुनामी सराव IOWave18

Posted On: 06 SEP 2018 6:24PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2018

 

भारतासह 23 देशांमध्ये 4 आणि 5 सप्टेंबर 2018 रोजी IOWave18 हा त्सुनामी सराव घेण्यात आला. युनेस्कोच्या आंतरसरकारी सागरी विज्ञान आयोगातर्फे या सरावाचे आयोजन करण्यात आले. या सरावात भारतातर्फे राष्ट्रीय सागरी माहिती सेवा, भूविज्ञान मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गृहमंत्रालय, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद बल आणि किनारी भागातील राज्ये/केंद्रशासित प्रदेश सहभागी झाले.

सरावादरम्यान अंदमान, निकोबारमधील 1000, पश्चिम बंगालच्या तीन जिल्ह्यांमधील 1200, तामिळनाडूच्या 13 जिल्ह्यांमधील 5054, पुद्दुचेरीमधील सुमारे 100, आंध्रप्रदेशच्या नऊ जिल्ह्यांमधील 8020 तर ओदिशाच्या सहा जिल्ह्यांमधील 328 गावांमधील नागरिकांची सुटका करण्यात आली. दोन दिवस चाललेल्या या सरावादरम्यान जीटीएस, फॅक्स, लघुसंदेश आणि संकेतस्थळांच्या माध्यमातून 15 त्सुनामी वार्तापत्रे जारी करण्यात आली.

राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे ज्येष्ठ सल्लागार, निवृत्त मेजर जनरल व्ही. के. नाईक यांच्या देखरेखीखाली हा त्सुनामी सराव पार पडला.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor


(Release ID: 1545213) अभ्यागत कक्ष : 162
Read this releasein: English