निती आयोग

भारतातील पहिल्या ‘ग्लोबल मोबिलिटी समीट 2018 मूव्ह’ चे पंतप्रधानांच्या हस्‍ते 7 सप्टेंबर रोजी उद्‌घाटन

Posted On: 06 SEP 2018 5:48PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2018

 

नवी दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित ग्लोबल मोबिलिटी समीट-2018 मूव्ह चे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या होणार आहे. नीती आयोगातर्फे 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवस या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

मोबिलिटी आणि संबंधित भागधारकांशी संबंधित विविध मुद्यांबाबत जनजागृती वाढविणे, हा या संमेलनामागचा मुख्य उद्देश आहे. या संमेलनात आंतरशासकीय संघटना, शिक्षणतज्ञ, विचारवंत आणि मोबिलिटी क्षेत्रातील धुरीणांबरोबरच संबंधित क्षेत्रांमधले अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. राजीव कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. रस्ते परिवहन आणि महामार्ग, ऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या सचिवांसह अवजड उद्योग विभागाचे प्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

या संमेलनाच्या माध्यमातून देशभरात प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या प्रवासाच्या पद्धतीत क्रांतिकारी बदल घडवून आणणे, अपेक्षित असल्याचे अमिताभ कांत यांनी यावेळी सांगितले. संचार क्षेत्रातील विकासामुळे रोजगार निर्मितीला चालना मिळेल आणि नागरिकांचे जगणे अधिक सुसह्य होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.  

 

S.Tupe/M.Pange/P.Kor



(Release ID: 1545186) Visitor Counter : 113


Read this release in: English