उपराष्ट्रपती कार्यालय

अमेरिकेत आयोजित दुसऱ्या विश्व हिंदू परिषदेला उपराष्ट्रपती उपस्थित राहणार

Posted On: 06 SEP 2018 1:59PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 सप्टेंबर 2018

 

अमेरिकेत शिकागो येथे 8-9 सप्टेंबर 2018 या दिवशी आयोजित दुसऱ्या विश्व हिंदू परिषदेला उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू उपस्थित राहणार आहेत. 1893 साली आयोजित प्रतिष्ठीत विश्व हिंदू परिषदेत स्वामी विवेकानंदांनी केलेल्या ऐतिहासिक भाषणाला 125 वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

ग्रेटर शिकागो येथे हिंदू मंदिरात 14 तेलगू संघटनांतर्फे आयोजित कार्यक्रमालाही उपराष्ट्रपती हजर राहणार आहेत. परिषदेच्या पार्श्वभूमीवर काही जागतिक नेत्यांशीही उपराष्ट्रपती द्विपक्षीय चर्चेत सहभागी होणार आहेत.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor


(Release ID: 1545125) Visitor Counter : 121
Read this release in: English