वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय

GeM च्या माध्यमातून होणारे व्यवहार 3 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचणार-सुरेश प्रभू

Posted On: 05 SEP 2018 6:31PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 5 सप्टेंबर 2018

 

GeM अर्थात गव्हर्नमेंट ईमार्केट प्लेसबाबत जनजागृती वाढविण्यासाठी आणि त्याच्या वापराला चालना देण्यासाठी केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री सुरेश प्रभू यांनी आज नवी दिल्लीत नॅशनल मिशन ऑन गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसचे उद्‌घाटन केले. या मंचाच्या माध्यमातून होणारे व्यवहार पुढच्या तीन वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सवर पोहोचतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या मोहिमेच्या माध्यमातून देशभरातील कारागिर, स्टार्ट अप्स आणि स्वयं सहायता गटांना या मंचावर आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याची माहिती दिली. 6 सप्टेंबर अर्थात उद्यापासून 17 ऑक्टोबर 2018 या अवधीत ही मोहिम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक कार्यशाळा, रोड शो, प्रशिक्षण तसेच खरेदीदार आणि विक्रीकर्त्यांची नोंदणी असे अनेक उपक्रम राबविले जाणार आहेत. डिजिटल इंडिया चे लक्ष्य साध्य करण्यासाठी कागदरहित आणि रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनेही या उपक्रमाअंतर्गत प्रयत्न केले जाणार आहेत.

 

S.Tupe/M.Pange/P.Kor

 



(Release ID: 1545026) Visitor Counter : 86


Read this release in: English